केरळ मध्ये मान्सून आज धडकणार ! महाराष्ट्रात 10 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज.-- भारतीय हवामान विभाग.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

यंदाच्या वर्षीचा मान्सून आज केरळात दाखल होण्याची शक्यता असून ,सर्वसाधारणपणे महाराष्ट्रात 10 जून पर्यंत दाखल होत आहे असे भारतीय हवामान विभागाने आपल्या संदेशात म्हटले आहे. यंदाच्या वर्षीच्या मान्सूनची महाराष्ट्रभर शेतकरी व नागरिक आतुरतेने वाट पाहत असून, उन्हाच्या लाटेपासून सुटका कधी होणार ? याकडे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग सुद्धा मान्सूनच्या आगमनाच्या प्रतीक्षेत उभा आहे. आजच्या परिस्थितीत मान्सून सध्या अंदमान निकोबार  बेटापर्यंत पोहोचला असून, दक्षिण अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरातील दक्षिण भाग हा यंदाच्या मान्सूनने व्यापला असून, त्याला सध्याच्या वातावरणात मान्सूनला पुढे सरकण्यास पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्या दृष्टीने  यंदाच्या वर्षीचा मान्सून जवळपास 4 जूनच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनच्या मोसमी वाऱ्याने अंदमान निकोबार बेटांचा भाग, श्रीलंका, मालदीव, कोमोरीनचा भाग व्यापला असून, केरळमध्ये आज दाखल होत आहे असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. महाराष्ट्रात संपूर्णपणे 10 जून पर्यंत,  यंदाच्या वर्षीचा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

 महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाला बहुतांश प्रमाणात सुरुवात झाली असून, पुढच्या आठवड्यात सर्वसाधारणपणे राज्यात पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग, यंदाच्या मान्सूनच्या आगमनाची वाट पाहत असून, लवकरच सुरू होणाऱ्या मान्सूनच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top