सांगलीत काँग्रेसचा महानिर्धार 2024 मेळावा, भारतीय जनता पार्टीचे देशातील , राज्यातील शिंदे व फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उखडून टाका !.--कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या.

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

सांगलीत झालेल्या आज काँग्रेसच्या महानिर्धार 2024 मेळाव्यानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले असून, नवनिर्वाचीत कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा सत्कार करण्यात आला. देशातील भाजपचे व महाराष्ट्रातील शिंदे व फडणवीसांचे भ्रष्ट सरकार उघडून टाका असे आवाहन कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले आहे. 

नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही सर्वांनी मिळून, भारतीय जनता पार्टीचे कमिशन घेत असलेले सरकार उखडून टाकले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कर्नाटक राज्यातील भाजपच्या सरकार सत्तेवर आणण्यासाठी तळ ठोकून प्रचार केला होता, परंतु कर्नाटकातील सुजाण जनतेने भारतीय जनता पार्टीला हाकलून लावले आहे. आज सांगलीत झालेल्या महानिर्धार 2024 च्या मेळाव्यानिमीत्त जोरदार शक्ती प्रदर्शन असलेली, कर्नाटकातील विधानसभा विजयानंतरची पहिलीच मेळावा सभा झाली आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन झाले असून ,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जोरदार आरोप केले असून, मी माझ्या 40 वर्षाच्या राजकारणाच्या कारकिर्दीत असा खोटाडा व थापाडा पंतप्रधान पाहिला नाही. सध्याच्या परिस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या सरकारवर लोकांचा विश्वास राहिला नसून, त्यांनी जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नसल्याचा आरोप कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला .सभेच्या सुरुवातीलाच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतराव दादा पाटील, स्वर्गीय पतंगराव कदम यांचे, कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्मरण करून, या सर्वांचा वारसा विश्वजीत कदम पुढे चालवतील असा विश्वास व्यक्त केला. देशात सध्या महागाईचा आगडोंब उसळला असून, 2 कोटी रोजगारांचा, काळा पैशाचा ,अच्छे दिन आणण्याचा, संकल्प पूर्णपणे खोटा ठरला आहे असा आरोप कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील सरकार प्रमाणे महिलांना 100 टक्के मोफत प्रवास, कर्नाटकातील सरकारने करावा असे आवाहन सांगली शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे कडे केले. त्याचबरोबर जतच्या पूर्व भागात शाश्वत स्वरूपात पाणी मिळावे या मागणीकडेही कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे लक्ष वेधले असता ,याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याचे त्यांनी अश्वस्थ केले. 

आजच्या सांगलीत झालेल्या महानिर्धार 2024 शक्ती प्रदर्शन मेळाव्यात, व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात, कर्नाटक राज्याचे मंत्री एम. बी. पाटील, मेळाव्याचे संयोजक आमदार विश्वजीत कदम ,आमदार सतेज पाटील, आमदार विक्रम सावंत ,प्रणिती शिंदे, जयंत आसगावकर ,माजी आमदार मोहनराव कदम ,कर्नाटकचे नेते बसवराज पाटील ,काकासाहेब पाटील, आर. यु. देशपांडे ,प्रकाश हुक्केरी, निरीक्षक संजय बालगुडे, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा बँक उपाध्यक्ष जयश्री पाटील ,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शैलजा पाटील आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top