सांगलीत आज 350 शिवराज्याभिषेक पोहळ्यानिमित्त साकारणार रायगडावरील महादरवाजा. पृथ्वीराज पाटील फौंडेशन व शिवप्रमींचा उपक्रम, नयनरम्य लाईट, लेझर शो, आतषबाजी व अवधूत गांधींचा "भक्ती शक्ती संगम" कार्यक्रमही होणार.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी) 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त  पृथ्वीराज पाटील फौंडेशन आणि शिवप्रमींच्यावतीने येथील मारूती चौकामध्ये छत्रपतींच्या पुतळ्यासमोर रायगडावरील महादरवाजा साकारण्यात आला आहे. सदर ठिकाणी मंगळवार दि. 6 जून, 2023 रोजी सकाळी 7 वा. पाच नद्यांच्या पाण्याचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 ते रात्री 10 दरम्यान नयनरम्य लाईट लेझर शो आणि आतषबाजी करण्यात येणार असल्याची माहिती सांगली शहर जिल्हा कॉंग्रेंस कमिटीचे अध्यक्ष श्री. पृथ्वीराज पाटील यांनी आज येथे दिली.

ते म्हणाले,  या कार्यक्रमाच्यावेळी फत्तेशिकस्त व पावनखिंड या चित्रपटातील गाजलेल्या गितांचे गायक श्री. अवधूत गांधी आळंदीकर यांचा "भक्ती शक्ती संगम" हा कार्यक्रम होणार आहे.  दरम्यान सायं. 7 वा. अखंड शिवज्योतीचे पुजन, शिवशपथविधी होणार आहे.  हा एकुणच कार्यक्रम अत्यंत भावपुर्ण आणि मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होणार आहे.  

ते म्हणाले, रायगडावरील महादरवाजाची प्रतिकृती विख्यात कला दिग्दर्शक नितीन कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन साकारलेली आहे.  30 फुट उंचीची अत्यंत भव्यता असलेली आणि इतिहास जपणारी कलात्मकता असलेली ही प्रतिकृती आहे.  ती पाहिल्यानंतर दुर्गराज रायगडाच्या प्रवेशाचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. यासोबतच शिवप्रभुंच्यावरील गिते, प्रेरणा आणि संगीत यांचे नियोजन करण्यात आले आहे.

श्री. पाटील म्हणाले, गेल्या वर्षी गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टमार्फत शिवराज्याभिषेक दिनी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या रायगडावरून शिवज्योत प्रज्वलित करून मारूती चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर अखंड शिवज्योत प्रज्वलित करण्यात आली. देशातील ही अखंड तेवणारी पहिली शिवज्योत आहे.

या वेळी पद्माकर जगदाळे, असिफ बावा, शिवश्री डॉ. संजय महादेव पाटील, शिवश्री श्रीरंग पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, बिपीन कदम, नितीन चव्हाण, रविंद्र खराडे, सनी धोतरे, आयुब निशानदार, एन. एम. हुल्याळकर, उत्तम सुर्यवंशी, सुधीर सावंत, अजय देशमुख,   अमित बस्तवडे, मारूती देवकर, राजेंद्र कांबळे, आनंदा पाटील, मंदार काटकर, राहुल जाधव, रमेश जाधव, सुधिर देशमुख, जमीर फरास, ऋषिकेश पाटील, ताजुद्दीन शेख, आशिष चौधरी, अनिल शेटे, रोहन मस्कर, सचिन पाटील, प्रश्नांत अहिवळे, नितीन तावदारे, जयराज पोळ, आदि मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top