सांगलीत आज सायंकाळी 6:00 वाजता, 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा आयोजक पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सांगली यांच्यावतीने व सांगली जिल्हा शहर काँग्रेस अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार.---

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

सांगली जिल्हा शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि बहुजन शिक्षण संस्था चालक मा. पृथ्वीराजबाबा पाटील यांचे आम्ही सांगलीकर हार्दिक अभिनंदन करतो. त्याचे कारणही तसे खासच आहे. 

सांगलीची २२ वैशिष्ट्ये आहेत. ही वैशिष्ट्ये आम्ही सांगलीकर म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटण्याजोगी आहेत. आता यामध्ये पृथ्वीराज पाटील यांनी २३ व्या वैशिष्ट्याची भर घातली आहे. हे वैशिष्ट्य साधेसुधे नाही तर महाराष्ट्र आणि अखंड भारताचे दैवत छ. शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष प्रशासनाची कीर्ती सर्वदूर पसरवण्याची बाबांची तळमळ आहे. आणि हे फार मोठे रचनात्मक योगदान आहे. गेल्या वर्षी ६ जूनला ३४९ व्या शिवराज्याभिषेक दिनी रायगडावरून बाबांनी शिवज्योत आणून ती मारुती चौकातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर प्रतिष्ठापित केली. ही शिवज्योत अखंडपणे तेवत ठेवून सांगलीला तेजाळत ठेवण्याचे महत्कार्य बाबांनी केले आहे. हे आपल्या देशात पहिल्यांदाच घडले उद्या या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. ही वर्षपूर्ती भक्तीपूर्वक साजरी करताना नयनरम्य प्रकाश, लेझर शो व आतषबाजी करून रायगडावरील महाद्वार सांगलीत साकारण्याची कर्तबगारी बाबा करताहेत. शिवज्योत आणि रायगडचा महादरवाजा ही महाराष्ट्राची दोन फुफ्फुसे आहेत. छ. शिवाजी महाराज आपले श्वास आहेत. शिवबांचे लोककल्याणकारी कार्य ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे. छ. शिवाजी महाराजांच्या आदर्शांची जपणूक जोपर्यंत होत राहील तोपर्यंत महाराष्ट्र प्रगतीपथावर आरुढ राहील आणि हे नव्या पिढीला समजले पाहिजे हा आग्रह बाबांचा आहे. शिवज्योत आणि रायगडचा महादरवाजा या सांगलीच्या २३ व्या वैशिष्ट्याची नोंद घेतल्याशिवाय सांगलीचा इतिहास पुढे सरकू शकणार नाही एवढे याचे महत्व आहे. सांगलीच्या युवापिढीने शिवराज्याभिषेक, शिवज्योत आणि रायगडचे महत्त्व समजावून घेऊन मानवतावादी चळवळ मजबूत करण्यासाठी पुढे यावे ही बाबांची अपेक्षा दखलपात्र निश्चितच आहे. संविधान, संसद आणि विधीमंडळाचा कृतीशील सन्मान करणारा हा बाबांचा विचार व संकल्पना केवळ सांगली नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राची शान आहे. 

उद्या ६ जूनला भारतभर ३५० वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे आणि या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व अमर करण्यासाठी सांगलीत रायगडचा महादरवाजा साकार होत आहे. रयतेच्या कल्याणासाठी रायगडचा दरवाजा शिवबांनी सताड उघडा ठेवला. सांगलीकरांच्या कामासाठी बाबांनी यशोधनचा दरवाजा सताड उघडा ठेवला आहे.दरवाजाचा आकार कमी जास्त जरुर असेल परंतु त्या दरवाजातून आत येणारी माणसं ही आपलं काम होईल.. न्याय मिळेल या भोळ्या भाबड्या आशेनं येतात.. त्यांच्या समस्या सोडवून त्यांना दिलासा देणं.. लोकसेवक म्हणून सामान्य माणसांच्या पाठिशी राहून लोकांना निर्भयपणे जगण्यासाठी मदत करणं हा खरा सन्मान शिवज्योतीचा.. रायगडच्या महादरवाजाचा आहे ही बाबांची प्रामाणिक भावना आहे. रायगडच्या महादरवाजाची महाशक्ती ही खरी राष्ट्रशक्ती आहे. हे वैभव पहाण्यासाठी आणि या ऐतिहासिक घटनेचे सक्रिय साक्षीदार होण्यासाठी दि. ६जून २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपस्थित रहावे असे आवाहन प्रा. एन .डी. बिरनाळे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top