कोल्हापुरातील सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी ही एकत्र येऊया.--आमदार ऋतुराज पाटील.

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

लोकराजे शाहू महाराज हे माणूस म्हणून फक्त माणसांसाठी जगले. त्यांनी कधीही जात आणि धर्माला महत्त्व दिले नाही. सतत सामाजिक सलोखा जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी जगात प्रथम न मागता आरक्षण दिलं. पाण्यासाठी धरण बांधले. कला आणि कुस्तीला मदत केली. आपल्या राज्यातील महिलांना अधिकार दिले. आपली रयत शिकावी म्हणून खास प्रयत्न केले. आपल्या राज्यात गरीब माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. राजर्षी शाहू हे एक दीपस्तंभ होते. ज्ञानवंत होते. मानवतावादी भूमिका घेऊन जगणारे महामानव होते. त्यांचे विचार व सामाजिक सलोखा जपण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ या असे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. आर्यारवी एंटरटेनमेंट, मुंबई, निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात बोलत होते. यावेळी साहित्यिक व विचारवंत डॉ. बाबुराव गुरव, शिवराय फुशांबु ब्रिगेड, मुंबईचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत फडतरे यांना राजर्षी शाहू प्रेरणा जीवन गौरव पुरस्कार तर राजर्षी शाहुंच्या विचारांना आदर्श मानून कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील 75 मान्यवरांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार राजीव आवळे, विद्रोही शाहीर संभाजी भगत, ज्येष्ठ विचारवंत प्रा. टी. के. सरगर, धम्म अभ्यासिका विजया कांबळे, धम्मलिपीच्या अभ्यासिका छाया पाटील, ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर, दिग्दर्शक महेश्वर तेटांबे, बालनाट्य अलबत्या गलबत्या फेम सागर सातपुते, धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल, निर्मिती विचारमंचचे अध्यक्ष अनिल म्हमाने, संवाद प्रकाशनाच्या प्रकाशिका डॉ. शोभा चाळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दिवसभर चाललेल्या या महोत्सवात मुजरा, अंतरंग, बुद्धा या लघुपटासह विविध भागातील विविध विषयावरील 10 हून अधिक लघुपट दाखवण्यात आले. यातून बाल कलाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांचे जीवन उलघडले. राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सव मुख्य आयोजन बाल आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, आर्य तेटांबे, तक्ष उराडे, अतिफ काझी, शाहू पाटील, प्रांजल सुरवशी, स्वरा सामंत, श्रावस्ती तामगाडगे, कोमल लांडगे, श्रीजा पाटील, अनघा सुतार, कनिष्का खोबरे, स्वराज किरवेकर, पुष्कर कुसूरकर, स्वरल नामे, इझयान मुरसल, शौर्या देसाई, हृद्वी पवार, अवंती मोखले, भक्ती भस्मे, भूमी भस्मे, सिद्धांत महापुरे, अन्वय म्हमाने, ऋतुजा शिंदे, वेणू तिप्पाण्णावर, पृथ्वीराज वायदंडे यांनी केले असून सहकार्य अनिरुद्ध कांबळे, स्नेहल माळी, अरहंत मिणचेकर, नामदेव मोरे, अनुष्का माने यांनी केले होते.राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवास राजर्षी शाहू प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र यांच्यासह राजेंद्र कोरे, प्रा. बसवंत पाटील, कुमार ननावरे, मदन पवार, शंकर पुजारी, डॉ. देवेंद्र रासकर, डॉ. साक्षी सुतार, जनार्दन पाखरे, मोहन कांबळे, सुप्रिया किरवेकर, अपूर्वा पाटील, प्रियांका पाटील, डॉ. प्रदीप लांडगे, समीर शेख, दिलीप कांबळे, प्रा. डॉ. सुभाष इंगळे, शोभा डोंगळे, अविराज गवळी, बाळासाहेब बोडके, चंद्रकांत सावंत, सुनिता सुतार, संजय सासणे (कोल्हापूर) अनिरुद्ध कांबळे, विनायक पाटील, डॉ. राज सोष्टे (मुंबई) युवराज सावंत (दोडामार्ग) उत्तम रेडकर, किसन फडते, सूर्यकांत तोरस्कर (गोवा) पँथर शेषराव नेवारे (नागपूर) लक्ष्मण माळी, आनंदी काळे, चाँदभैया शेख (सोलापूर) राजू पवार (छत्रपती संभाजी नगर) धनंजय वाघमारे, चंद्रशेखर तांदळे, अस्मिता पवार, डॉ. हाशिम वलांडकर (सांगली), महादेव गायकर (रायगड), डॉ. शंकर अंदानी, अंजना पारखे (अहमदनगर), श्रृती सैतवडेकर (रत्नागिरी) महेश चव्हाण (यवतमाळ) डॉ. संजय वाघंबर (लातूर) सुरेखा महिरे (नंदुरबार) नितीन यादव, काळुराम लांडगे (पुणे) गोविंद पाचपोर (जालना) निशा चौबे, दिक्षा सोनटक्के, डॉ. चंदनसिंह राजपुत, जया बद्रे, बरखा बोज्जे (अमरावती) उमर फारूख खान (आंध्र प्रदेश) मुकुंदराव बागडे (गोंदिया) दामोदर दीक्षित, अनुपमा दाभाडे, डॉ. शुभांगी कुंभार (सातारा) मिलिंद आळणे (वसमत) संतोष राऊत, सायमन रॉड्रिग्ज (पालघर) सुरेश हिवराळे (परभणी) जयकुमार व्यवहारे (चिपळूण) भाऊसाहेब कांबळे (निपाणी) डॉ. यशवंत पाटील (जळगाव) डॉ. मंगेश सानप (ठाणे) अनंत घोगरे, अच्युत माने (उस्मानाबाद) या मान्यवारांना राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. स्वागत प्रास्ताविक ॲड. करुणा विमल यांनी केले सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top