सांगलीतील जातीय सलोखा बिघडवणाऱ्या प्रवृत्ती ठेचून काढा पृथ्वीराज पाटील यांची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे मागणी.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

 (अनिल जोशी)

 कोल्हापूर पाठोपाठ सांगली आणि मिरजेतही जातीय सलोखा बिघडवण्याचे काम काही प्रवृत्ती करत असतील तर अशा प्रवृत्ती हुडकून काढून त्या ठेचून काढाव्यात आणि त्यांच्यावर जरब बसवावी अशी मागणी सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी नगरसेवक अभिजीत भोसले, शंभूराज काटकर, अजित दुधाळ, अल्ताफ पेंढारीयांच्या शिष्ट मंडळासह जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांच्याकडे केली आहे.

पाटील यांनी आज तेली यांची भेट घेतली आणि सांगली, मिरजेत उद्भवलेल्या काही घटनांच्या बाबतीत चर्चा केली. जे लोक जातीय सलोखा बिगडवू पाहत आहेत त्यांच्यावर तातडीने कडक कारवाई करावी, त्यांनी पुन्हा डोके वर काढता कामा नये.प्रत्येक पोलिस स्टेशन आणि प्रत्येक वार्ड निहाय शांतता कमिटीच्या बैठका घ्याव्यात, सर्वपक्षीय बैठक घेऊन शांतता प्रस्थापित करण्याबाबत आवाहन करण्यात यावे असेही त्यांनी सुचवले.

लोकांनी केलेल्या सूचनांचीही पोलिस स्टेशनमध्ये दखल घेतली जावी, आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असेही पाटील यांनी सुचवले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top