सांगलीत आज सांगली जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने, खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त, "गद्दार दिवस" आंदोलनाने साजरा.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ. जयंत पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज चा दिवस हा ' गद्दार दिवस' म्हणून साजरा करण्यात आला.त्याच अनुषंगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी जिल्हा कार्यालय येथे 'खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त 'गद्दार दिवस' आंदोलन करण्यात आले.

शिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला आज २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले . खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त 'गद्दार दिवस' निम्मित ,खोक्यांचे राजकारण करुन धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश   राष्ट्रवादी  काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या  वतीने आंदोलन व निषेध करून देण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी.., 

चले जाव-चले जाव.. गद्दार गुहाटी चले जाव..!

महाराष्ट्र त्रस्त... खोके घेऊन गद्दार मस्त.., 

पन्नास खोके.. माजलेत बोके माजलेत बोके...

गद्दार हटाव..महाराष्ट्र बचाव..!

महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार.., 

खोके सरकारचा चालणार नाही थाट 

गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट...

पन्नास खोके, गद्दार 'Not' ओके...

खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय... 

    अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.    

यावेळी राष्ट्रवादी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके , तानाजी गडदे ,उत्तम कांबळे ,स्वाती पारधी, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे ,वैशाली कळके ,ज्योती अदाटे, छाया जाधव , समीर कुपवाडे , आयुब बारगिर ,बिरेंद्र थोरात , डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे, उमर गवंडी , अर्जुन कांबळे ,संगीता जाधव , आशा पाटील, विनायक हेगडे, प्रकाश सुर्यवंशी , इर्शाद पखाली ,फिरोज मुल्ला , अरुण चव्हाण , मुन्ना शेख ,नंदकुमार घाडगे , अमीन शेख ,जमीर ऐनापुरे ,अझर सय्यद , सचिन सगरे , दत्ता पाटील , राहुल यमगर ,विजय जाधव ,सतीश इंगवले ,ऋषिकेश गवळे , महादेव काळे ,आशिष पवार ,आदर्श कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top