सांगलीत लोकाराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त, सांगली जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाकडून अभिवादन. ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली , राष्ट्रवादी सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज व युवक शहरजिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या पुढाकाराने लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहरजिल्ह्याच्या वतीने अभिवादन करण्यात आले . 

राजर्षी शाहू महाराज यांनी जातीयता संपवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना शिक्षणाची, वसतिगृहांची सोय उपलब्ध करून दिली.शिक्षणाच्या अभावाने कोणीच मागे पडू नये म्हणून त्यांनी सर्वांनाच शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नसत त्यांना कायद्याने १ रुपया दंड ठोठावला जात असे .आज भारताला सर्वात जास्त गरज या शैक्षणिक धोरणाचीच आहे. दुर्बल घटक ज्यांना कधी संधीच दिली गेली नाही, त्यांना समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, सर्वांना समान संधी मिळण्यासाठी त्यांनी भारत देशात सर्वप्रथम आरक्षण पद्धत लागू केली.जी पुढे भारतीय राज्यघटनेतही समाविष्ट करण्यात आली आहे. ते पुरोगामी, सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते होते. कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य, शिक्षण अशा सर्वांना राजाश्रय दिला , अश्या लोकांच्या कल्याणा करिता आयुष्यभर झटत राहणाऱ्या आपल्या लोकराजाला आम्ही विनम्र अभिवादन करीत आहोत अश्या भावना पदाधिकारी यांनी या प्रसंगी व्यक्त केल्या .

यावेळी सांगली शहराध्यक्ष सागर घोडके, तानाजी गडदे, अनिता पांगम ,जुबेर चौधरी,समीर कुपवाडे, बिरेंद्र थोरात ,डॉ शुभम जाधव , महालिंग हेगडे ,उमर गवंडी, गॅब्रियल तिवडे , संगीता जाधव ,उषा गायकवाड, मुन्ना शेख, नंदकुमार घाडगे ,अभिजित रांजणे ,विजय जाधव ,बालम मुजावर आदी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top