सांगलीतील वीज बिल घोटाळ्यासंबंधी लोकायुक्तांनी दिलेल्या एस.आय.टी.चौकशीच्या आदेशाबाबत दोन महिन्यानंतरही एक गुढ कायम ,अद्यापही एस.आय.टी.ची नियुक्ती नाही!.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

सांगलीतील विज बिल घोटाळा संबंधित राज्याचे लोकायुक्त शरद कानडे यांनी दिलेल्या एस.आय.टी. चौकशीच्या आदेशानंतरही दोन महिने उलटूनही, अद्यापही एस.आय.टी.ची पथकाची नियुक्ती झालेली नाही. येत्या 03 जुलै 2023 रोजी राज्यांच्या लोकायुक्तांसमोर सुनावणी होणार असून, महापालिका प्रशासन याबाबतीत कोणती भूमिका मांडेल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबरोबरच राज्याच्या लोकायुक्तांनी राज्याच्या नगरविकास विभागाला देखील, सांगलीत झालेल्या घोटाळ्याच्या अनुषंगाने, इतरत्र कुठेही याची पुनरावृत्ती झाली आहे का? याबाबत पडताळणी करावी असे आदेश दिले आहेत. राज्याचे लोकायुक्तानी महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, सदर घोटाळ्याबाबत विचारणा करून खात्री झाल्यानंतरच, 28 एप्रिल ला घोटाळ्याच्या चौकशीसाठी, पोलीस खात्यातील, महापालिका प्रशासनातील, लेखापरीक्षणातील प्रत्येकी एक वरिष्ठ अधिकारी नियुक्त करून ,शिवाय तक्रारदार वि. द. बर्वे व महापालिका आयुक्त यांच्या संमतीने आणखी एखाद्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जावी असे आदेशात नमूद केले आहे .संबंधित विज बिल घोटाळ्याच्या संदर्भात एस.आय.टी.ला संपूर्ण सहकार्य केले जाऊन, चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी नियुक्त करावा यासाठी पोलीस महानिरीक्षकांकडे एक पत्र पाठवले आहे, असा खुलासा सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी केला आहे. एस.आय.टी.नियुक्ती बाबत टाळाटाळ केली जात असून, अद्यापही महापालिका किंवा पोलीस विभागाकडून दोन महिने झाले तरी आपल्याशी संपर्क झाला नाही, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते वि.द.बर्वे यांनी केले आहे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेचे तत्कालीन आयुक्त यांनी ,खाजगी व्यक्तीमार्फत केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीबाबतही, केवळ 1.23 कोटी रुपयांच्या घोटाळ्याबाबतची कबुली दिली आहे. सदर केलेली चौकशीही वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे .दोन महिने झाले तरी अद्यापही एस.आय.टी.ची नियुक्ती झाली नसून, एस.आय.टी.चौकशीसाठी का टाळाटाळ होत आहे ?या गोष्टींचा उलगडा होणे अत्यंत आवश्यक आहे. दरम्यान या विज बिल घोटाळ्यात बँक अधिकाऱ्यांचा देखील सहभागा असून, त्यांच्यावरही योग्य ते गुन्हे दाखल करावेत असे राज्याच्या लोकायुक्तांच्या आदेशात नमूद केले आहे. एकंदरीत येत्या 3 जुलै 2023 रोजी राज्याच्या लोकायुक्तांसमोर होणाऱ्या सुनावणीत काय निर्णय होणार ?  याबाबतीत पुढे काय होते ? हे बघावे लागेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top