सांगलीतील विकास कामाबाबत, सांगलीचे खासदार संजयकाका पाटील ह्यांनी,केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरींची घेतली भेट ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी) 

केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री माननीय नामदार नितीनजी गडकरी  यांची  दिल्ली येथे खासदार संजयकाका पाटील ह्यांनी भेट घेतली व विकासकामांबाबत निवेदन दिली.या भेटीदरम्यान खालील विकास कामाच्या बाबतीत चर्चा झाली. 

1.अहमदनगर दौंड-फलटण - दहीवडी -मायणी - विटा - तासगाव-काकडवाडी-तानंग फाटा-म्हैसाळ (कर्नाटक राज्य सीमेपर्यंत) चा राष्ट्रीय महामार्ग 160 हा भविष्यातील देखरेखी साठी आणि सोयी सुविधांसाठी NHAI कडून NHPWD कडे हस्तांतरित करणे. 

2. सांगली लोकसभा क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्गाच्या सुरक्षेतेबाबत व येणाऱ्या पावसाळ्या बद्दल खबरदारी म्हणून होणारे  अपघात रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे व त्यासंदर्भात पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याबाबत तरतूद करावी याकरिता निवेदन दिले. 

3. पुणे बेंगलोर ग्रीन फील्ड द्रुतगती महामार्ग हा उत्तर भारत व दक्षिण भारत यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो तसेच सातारा व सांगली जिल्ह्यातील आर्थिक मागासलेल्या क्षेत्रांना समृद्धी देण्यासाठी संजीवनी ठरू शकतो सदर पुणे बेंगलोर हायवेचे काम प्रगतीपथावर आहेत. या कामाची लवकरात लवकर अंमलबजावणी करून सदर हायवेचे काम सुरू करावे याकरिता निवेदन दिले.

4.उमदी, ता.जत येथील राष्ट्रीय महामार्ग वर डिव्हायडर व चौपदरीकरण करण्यासाठी निवेदन देण्यात आले.या सर्व विकासकामांबाबत माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत सकारात्मक चर्चा झाली.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top