कोल्हापुरातील नागरिकांनी भयमुक्त राहावे, पोलीस प्रशासन सदैव तुमच्या पाठीशी राहील तसेच शहरातील परिस्थिती पूर्वपदावर.-- जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित.

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

 (अनिल जोशी)

 कोल्हापूर पोलीस प्रशासनाच्या वतीने ,कोल्हापूर शहरातील सध्याची शांततेची स्थिती कायम राहणेसाठी व परिस्थिती चिघळणार नाही याची दक्षता चोख रीतीने घेण्यात येत असून, नागरिकांनी अफवाना बळी न पडता, भयमुक्त राहावे, जिल्हा पोलीस प्रशासन, कोल्हापूर नागरिकांच्या पाठीशी राहील असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे .कोल्हापूर पोलीस प्रशासनातील सर्व अधिकारी ,जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी वर्ग, शहरात ठीक ठिकाणी उपस्थित असून, जिल्ह्यातील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्य परिस्थिती लक्षात घेऊन, सकाळपासूनच शहरांमध्ये सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, एस आर पी एफ च्या अतिरिक्त तुकड्या ही मागवण्यात आल्या आहेत .कोल्हापूर शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

 कोल्हापूर शहरातील ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे सुरू असून, शहरात हुल्लडबाजी व दगडफेक केलेल्यां व्यक्तींना शोधून काढून, पुढील कायदेशीर कारवाई त्यांचेवर करण्यात येईल. कोल्हापूर शहरात सध्या जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून, शहरातील शांतता सुव्यवस्था राखण्यात, जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना व  दक्षता घेण्यात येत आहेत. कोल्हापूर शहरातील नागरिकांनी अफवाना बळी न पडता, जिल्हा पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top