सांगलीतील धनगर समाज बांधवांचा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचा, जंगी नागरी सत्कार करण्याचा निर्धार.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी) 

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर प्रथमच सांगली जिल्हा दौऱ्यावर येत असलेले काँग्रेसचे नेते सिध्दरामय्या यांचा रविवार दि. २५ जून रोजी आयोजित नागरी सत्कार 'न भूतो न भविष्यती' अशा पध्दतीने जंगी करण्याचा निर्धार सांगली जिल्ह्यातील धनगर समाज बांधवांच्या बैठकीत करण्यात आला. काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीस सांगली जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 बैठकीत राष्टवादीचे नगरसेवक विष्णू माने म्हणाले, ना. सिध्दरमय्या यांचा सत्कार हा भव्य- दिव्य झाला पाहिजे. तो यशस्वीपणे पार पाडला पाहिजे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. यासाठी समाज बांधवांनी ढोल, ताशा वाजवत त्यांचे स्वागत करायला हवे. यावेळी तात्या गडदे, निवांत कोळेकर, अजित दुधाळ, अमित पारेकर, सुरेश कोळेकर, डॉ. विक्रम कोळेकर यांनी आपली मते मांडली. यावेळी कार्यक्रमाची माहिती सगळ्यापर्यत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करावा, होर्डिंग लावण्यात यावीत, धनगर समाजाने एकत्र येवुन सत्कार घ्यावा, समाजातील लोकांनी परंपरागत पोशाखात यावे, समाजातील लोकांनी बैठका आणि आपापल्या संपर्कातील लोकांना कार्यक्रमाची माहिती द्यावी इ. सुचना या बैठकीमध्ये करण्यात आल्या.  

या बैठकीस अर्जुन हजारे, बाळासाहेब मंगसुळे, दादासो बंडगर, अण्णासाहेब खोत, रावसाहेब यमगर, गजानन यमगर, आकाराम चौगुले, दाजी गडदे, अरूण रूपनर, हणमंत खरात, नेताजी हंकारे, संभाजी सरगर, शिवाजी शेंडगे, मनोज लांडगे, अमोल गडदे, विनायक रूपनर, तानाजी दुधाळ, पांडुरंग आलदर, तानाजी माने, बाळासाहेब फोंडे, तुकाराम मासाळ, सुरेश कोळेकर, धोंडीराम माने, तानाजी रूपनर, ईश्वर हुलवान, बळवंत खोत, विशाल सरगर, अनिकेत डोंबाळे, किरण एडके, राजू यमगर, दत्तात्रय चोरमुले, शिवाजी कोळेकर, पांडुरंग आलदर, प्रमोद एडके, शहाजी कोकरे, भार्गव अनुसे, अण्णासाहेब वाळके,  उत्तम जानकर, गजानन बिसले, बिपीन कदम, रवींद्र खराडे, आयुब निशानदार, सनी धोतरे, आशिष चौधरी, अल्ताफ पेंढारी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top