सांगली जिल्ह्यात खरीपाची 21.87 टक्के पेरणी झाल्याची माहिती. --जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार. ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

 सांगली जिल्ह्यात  खरीपाचे 2 लाख 55 हजार 984 हेक्टर क्षेत्र असून यापैकी 55 हजार 996 हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे. यंदाच्या खरीप  हंगामात  20 जुलै पर्यंत 21.87 टक्के पेरणी झाली असून यामध्ये सर्वाधिक भात पिकाची 85.83 टक्के पेरणी झाली आहे, अशी  माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली.

खरीप हंगामात भात पिकाचे 14275.8 हेक्टर क्षेत्र असून 12252.6 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 85.83 टक्के इतकी आहे. खरीप ज्वारीचे  26970.3  हेक्टर क्षेत्र असून 3456.5 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 12.82 टक्के इतकी आहे. बाजरी पिकाचे  54230.4  हेक्टर क्षेत्र असून 3602.7 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 6.64 टक्के इतकी आहे. मका पिकाचे 40753.4 हेक्टर क्षेत्र असून 6354.3 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 15.59 टक्के इतकी आहे. इतर तृणधान्याचे 1170.8 हेक्टर क्षेत्र असून 536 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 45.78 टक्के इतकी आहे. तूर धान्याचे 11184.3 हेक्टर क्षेत्र असून 448.2 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 4.01 टक्के इतकी आहे. मूग धान्याचे 7592.2 हेक्टर क्षेत्र असून 487 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 6.41 टक्के इतकी आहे. उडीद पिकाचे 14962.7 हेक्टर क्षेत्र असून 1332.6 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 8.91 टक्के इतकी आहे. इतर कडधान्याचे 6789.7 हेक्टर क्षेत्र असून 439.8 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 6.48 टक्के इतकी आहे. भुईमूग पिकाचे 33634.1  हेक्टर क्षेत्र असून 11689.4 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 34.75 टक्के इतकी आहे. सुर्यफूलाचे 850  हेक्टर क्षेत्र असून 5.4 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 0.64 टक्के इतकी आहे. सोयाबीन पिकाचे 43054.5  हेक्टर क्षेत्र असून 15208.6 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 35.29 टक्के इतकी आहे. कापूस पिकाचे 278 हेक्टर क्षेत्र असून 171 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पेरणीची ही टक्केवारी 61.52 टक्के इतकी आहे.नाचणीचे 125 हेक्टर, तिळाचे 5 हेक्टर, इतरतेल बियाचे 68 हेक्टर क्षेत्र असून या पिकांची अद्यापही पेरणी झाली नाही.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top