नागपुरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिटणीस नगरच्या वतीने, "जागतिक लोकसंख्या दिन" मोठ्या उत्साहात संपन्न. ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

नागपुरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिटणीस नगर च्या वतीने ,"जागतिक लोकसंख्या दिन"मोठ्या उत्साहात साजरा झाला. सदरहू महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ चिटणीस नगर नागपूरच्या वतीने झालेल्या जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून,एस  हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रकाश ढगे हे होते, तर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रसिका गोंधळे, सहाय्य कामगार कल्याण आयुक्त नंदलाल राठोड व डॉ. ज्योती ढगे ह्या होत्या. 

 नागपुरातील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या जागतिक लोकसंख्या दिनाच्या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डॉ. प्रकाश ढगे यांनी, जागतिक लोकसंख्या दिनाचे महत्त्व प्रामुख्याने विशद केले. आयुष्याच्या उतरत्या काळात माणसाच्या जीवनात अन्न -वस्त्र -निवारा यांची उपलब्धता असावी.,जेणेकरून त्याला त्याच्या वारसांच्यावर अवलंबून राहण्याची आवश्यकता पडू नये .त्यासाठी सध्याच्या काळात प्रत्येक कुटुंबाने आपले कुटुंब नियंत्रणात ठेवावे, यासंबंधी माहिती विशद करून सांगितली. महाराष्ट्र शासनाने प्रत्येक निराधार व्यक्तीस, आर्थिक मदत पण देण्याची तरतूद करावी असे आवाहन, शासनास, सदरहू कार्यक्रमाचे  प्रमुख अध्यक्ष या नात्याने डॉ. प्रकाश ढगे यांनी केले .नागपूरातील, आपल्या एका अपत्यावर सुख- समाधानाचा संसार करून ,कुटुंब नियोजन कार्यक्रमात यशस्वी झालेल्या 5 सुखी दांपत्यांचा सत्कार या वेळेला करण्यात आला .त्यावेळी कुटुंब नियोजनातील सुखी दांपत्य म्हणून मानकरी ठरलेल्या प्रत्येक कुटुंबीयास रुपये 5000 रोख, शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. कुटुंब नियोजनातील सत्कारमूर्ती ठरलेल्या कुटुंबीयांमध्ये, श्रीयुत केशव वासनिक, श्रीयुत रितेश चिमोटे, श्रीयुत सुनील अखंड, श्रीयुत युवराज गायकवाड व श्रीयुत विजय उहाके यांचा समावेश आहे. 

नागपूरमध्ये महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ च्या वतीने झालेल्या जागतिक लोकसंख्या दिन सोहळा समारंभाचे प्रास्ताविक, कामगार कल्याण अधिकारी छोटू जाधव व संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन सुधर्मा खोडे यांनी केले.शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुधीर चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top