महाराष्ट्राचे शिल्पकार व दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले शैक्षणिक क्रांतीचे जनक ,माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या तंत्रशिक्षणाच्या ऐतिहासिक धोरणावर विशेष दृष्टिक्षेप.--

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

महाराष्ट्राचे शिल्पकार व दूरदृष्टीचे नेतृत्व लाभलेले शैक्षणिक क्रांतीचे जनक, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील यांनी तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात जी ऐतिहासिक क्रांती व कामगिरी केली, त्या कामगिरीबद्दल आज हा एक विशेष दृष्टिक्षेप टाकत आहोत. शिक्षण क्षेत्र हा दादांच्या विशेष आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. ते स्वतः सातवीच्या पलीकडे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्याच कारणाने सर्व स्तरांतील विद्यार्थ्याना शिक्षण मिळाले पाहिजे, अशी त्यांची तळमळ होती. माध्यमिक शालान्त परीक्षा आणि उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना महाविद्यालये नसल्यामुळे प्रवेश मिळत नसल्याचे दादांनी अनेक तज्ज्ञांच्या अभ्यास- निष्कर्षावरून जाणले होते. दरवर्षी पास होणाऱ्या विद्यार्थीसंख्येच्या पाच टक्के विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याची क्षमता राज्यातील तंत्र महाविद्यालयांमध्ये नव्हती. त्याचाच परिणाम म्हणून राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना शेजारच्या कर्नाटकसारख्या राज्यांकडे धाव घ्यावी लागत होती. दादांनी या समस्येवर अनेक तज्ज्ञांसमवेत विचारमंथन केले होते, विनाअनुदानित तत्त्वावर शिक्षण संस्था उभ्या राहिल्यास राज्याच्या शिक्षण क्षेत्राला वेगळी दिशा मिळेल, तसेच ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थी चांगले शिक्षण घेऊ शकेल, या निष्कर्षापर्यंत दादा आले होते. त्याच कारणाने १९८३ मध्ये राज्यात ५१ नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये, ८० तंत्रनिकेतने आणि १०० तंत्रशाळांना परवानगी देण्याचा ऐतिहासिक निर्णय दादांनी तत्कालीन शिक्षणमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या साथीने घेतला. सुरुवातीला दादांच्या या निर्णयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली; परंतु दादांनी आपली भूमिका ठाम राखली आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांचा पुरस्कार केला.

राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांनी पंढरपूरला भेट दिली होती. त्या भेटीवेळी दादाही त्यांच्यासोबत होते. तेव्हा संत नामदेवांच्या वाङ्मयाचे अध्यासन स्थापन करण्याची सूचना झेलसिंग यांनी दादांना केली होती. त्यांच्या सूचनेनुसार दादांनी तातडीने पुणे विद्यापीठाला १० लाख रुपये देऊन संत नामदेव अध्यासन सुरू केले. हा लेख श्रीयुत राजा माने यांनी लिहिलेल्या संदर्भीय लिखाणातून, जनहितार्थ माहितीसाठी प्रसिद्धीस देत आहोत. आपल्या देशात तिसरे चंद्रयान सोडले त्यातील विद्यार्थी श्री. राजन कुराडे सध्या बेंगलोर येथे आहेत, ते ह्या मोहिमेत सहभागी आहेत. 


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top