सांगलीत आज विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण विरोधात, विशाळगड मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यासाठी मेळावा संपन्न ,शिवरायांच्या विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण हटवण्याची हीच वेळ आहे. यासाठी सर्व हिंदू बांधवांनी एकत्रित यावे .--माजी आ.नितीनराजे शिंदे

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

सांगलीत आज दि.13/07/2023 रोजी लो. टिळक स्मारक मंदिर येथे, सांगली जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणाविरोधात विशाळगड मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात आलं. हा मेळावा विशाळगड मुक्ती आंदोलनाचे निमंत्रक माजी आ. नितीन राजे शिंदे  व भाजपाचे युवा नेते पै. गौतम भैया पवार, शिवप्रतिष्ठानचे हनुमंतराव पवार, हिंदू एकता आंदोलनाचे विष्णुपंत पाटील. राष्ट्रीय स्वयंसंघाचे राजेश देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी छ. शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून आंदोलनाची स्फूर्ती मशालीचे दीपप्रज्वलन करण्यात आले. त्याच बरोबर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. हिंदू एकता आंदोलनाचे संस्थापक कै. नारायणराव कदम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.याप्रसंगी बोलताना या आंदोलनाचे निमंत्रक माजी आम.नितीनराजे शिंदे म्हणाले गेली वीस वर्षे तीव्र लढा उभा करून  प्रतापगडाच्या पायथ्याशी उभी करण्यात आलेले अफजल खानाचे थडग्या,भोवतीचा दर्ग्याचे अतिक्रमण हटवण्यासाठी रस्त्यावरची व विधान भवनातील लढाई लढून आम्ही महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारकडून अफजलखानाचा थडगं उध्वस्त करून टाकलं  त्याच धरतीवर आता विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून विशाळगडावरती उभारण्यात आलेला बेकायदेशीर दर्गा, व विशाळगडावरती झालेले इस्लामीकरण, त्या ठिकाणी सुरू असलेली मांसाहार विक्री दारू विक्री. बंद करून, तिथे उध्वस्त करण्यात आलेल्या हिंदू देवतांच्या मंदिराचे जिर्णोद्धार करणार आहोत. याच विशाळगडावर वीर बाजीप्रभू देशपांडे, वीर शिवा काशीद यांची भव्य स्मारक  उभा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ५०० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करणार आहोत. यासाठी लवकरच सांगली कोल्हापूर रत्नागिरी  जिल्ह्यातील सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्रित आणून विशाळगडावर भव्य आंदोलन उभं केलं जाईल. या मध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहन केले.

 याप्रसंगी बोलताना भाजपाचे युवा नेते पै. गौतम भैया पवार म्हणाले, केंद्रामध्ये मोदीजींच्या रूपाने हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आल आहे, महाराष्ट्रात भाजप सेनेचे हिंदुत्ववादी सरकार आलं आहे  नितीन राजे शिंदे यांनी ज्या पद्धतीने प्रतापगड भूमि मुक्ती आंदोलन यशस्वी केले.अगदी त्याच पद्धतीने विशाळगडाची मोहीम आपल्याला फत्ते करायांची आहे.इस्लामीकरण, आणि बेकायदेशीर दर्गा हटून त्या ठिकाणी शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक गडाचं व त्यावर असलेल्या हिंदू देवतांच्या मंदिरांचे पुनर्प्रस्थापन करणे ही आज काळाची गरज आहे. यासाठी या आंदोलनाला सर्वजण एकत्र येऊ, यासाठी  आम्ही सर्व प्रकारची मदत करू, कोणत्याही परिस्थितीत विशाळगडाला इस्लामी करण्याच्या विळख्यातून बाहेर काढू.  तोपर्यंत हे आंदोलन, हा लढा चालूच राहील यामध्ये सर्व हिंदू तरुणांनी सहभागी व्हावे असे आवाहन पवार यांनी केलं. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस केदार खाडीलकर यांनी केले यावेळी शिवप्रतिष्ठानचे  हणमंत पवार ,हिंदू जनजागृती समितीचे  संतोष देसाई,हिंदू एकता आंदोलनाचे  विष्णु पाटील,भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र साठे,बाळासाहेब पाटील तसेच ओमकार शुक्ल यांनी आपले विचार मांडले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश मोहिते यांनी केले. यावेळी नितीन देशमाने ,विजय भिडे ,विजय कडणे, शितल कर्वे, प्रथमेश वैद्य, अशोक गोसावी, बाळासाहेब मोहिते रवींद्र वडवणे, अप्पा डांगे, अजित काशीद, सौरभ सटाले , राहुल बोळाज, अमोल काळे, सचिन देसाई, पैलवान प्रदीप निकम, संजय जाधव, प्रकाश चव्हाण ,प्रकाश निकम यांच्यासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top