पश्चिम महाराष्ट्र मध्यवर्ती ठिकाणाचे विमानतळ होणे आवश्यक असल्याच्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील उत्तराने,सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाच्या आशेला बळ. --

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

पश्चिम महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाण असलेले विमानतळ होणे फार गरजेचे असल्याचे प्रतिपादन ,आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केले. सध्या परिस्थितीत कोल्हापूरला जरी विमानतळ असले तरी, पश्चिम महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाण असलेले एखादे विमानतळ होणे फार गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाचा प्रश्न, विमानतळ बचाव कृती समितीचे नेते पृथ्वीराज पवार व सतीश साखळकर यांनी वारंवार जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी अवगत करून धसास लावण्यासाठी प्रयत्न केला आहे. आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात,पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ होणे आवश्यक असल्याचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुतोवाच्याने, सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाच्या बाबतीत अशा पल्लवीत झाल्या आहेत. 

विधानसभेत झालेल्या प्रश्नोत्तराच्या तासावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका प्रश्नाच्या उत्तराला उत्तर देत असताना सभागृहात, सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ हे सभागृहात उपस्थित नव्हते, पण सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती असलेल्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाच्या बाबतीत विमानतळ होणे अत्यंत आवश्यक आहे ,ही माहिती देऊन आपण या संधीचा फायदा होण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासित केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विमानतळाच्या विषयाबाबत प्रश्न उत्तराच्या तासावेळी, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेणे आवश्यक होते, शिवाय ही एक महत्त्वाची संधी होती. पुढील तीन महिन्यातील उच्चस्तरीय बैठकीत, सांगलीतील कवलापूर विमानतळाचा प्रश्न अजेंड्यावर आणण्यासाठी, पूर्ण ताकतीने आम्ही ताकद पणाला लावून प्रयत्न करू असे प्रतिपादन विमानतळ बचाव कृती समितीचे नेते पृथ्वीराज पवार व सतीश साखळकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान वारंवार येत असलेल्या कृष्णा नदीच्या महापुरामुळे कोल्हापूर विमानतळाचा संपर्क महत्त्वाच्या प्रसंगी मदतीसाठी करता येत नसल्याने, पश्चिम महाराष्ट्रासाठी मध्यवर्ती असलेल्या ठिकाणी विमानतळ होणे अत्यंत गरजेचे असल्याचे ,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गरज प्रतिपादन केली आहे. यासाठी पुढील तीन महिन्यात एक उच्चस्तरीय बैठक घेऊन, पश्चिम महाराष्ट्रात मध्यवर्ती ठिकाणी विमानतळ विकसित करण्यावर भर दिला जाण्याचे स्पष्ट केले आहे.त्यामुळे सांगली जिल्ह्यातील कवलापूर विमानतळाला, मिळालेल्या पूर्वीच्या तत्त्वतः शासनाच्या मान्यतेला अनुसरून,सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आलेल्या संधीचा फायदा घेऊन ,सांगलीच्या विकासासाठी चालून आलेली संधी, सांगली विकासाच्या कामी कशी फलद्रूप होईल? यासाठी पूर्ण ताकद लावून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top