"रणजी करंडक महाराष्ट्र" संभाव्य क्रिकेट संघामध्ये ,सांगली जिल्ह्यातील पोलाइट स्पोर्ट्स क्लबचे तरणजीत सिंग धिल्लोन व विजय पावले या दोन खेळाडूंची निवड. --

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क 

(अनिल जोशी)

रणजी करंडक महाराष्ट्र क्रिकेट संघामध्ये सांगली जिल्ह्यातील  दोन खेळाडूंची निवड झालीआहे .नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र प्रीमियम लीग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील पोलाईट स्पोर्ट्स क्लब च्या   तरणजीत सिंग धील्लोन व विजय पावले या खेळाडूंची  रणजी  करंडक महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट  संघांमध्ये निवड  झाली आहे. रणजी करंडक महाराष्ट्र संभाव्य क्रिकेट संघांमध्ये निवड झालेबद्दल , महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मा.संजयजी बजाज यांच्या हस्ते तरणजीत सिंग धील्लोन व विजय पावले यांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित दादा पवार चेअरमन सचिन मुळे व खजिनदार संजयजी बजाज यांच्या  मार्गदर्शनाखाली सदर खेळाडूंची निवड झाली आहे तसेच या खेळाडूंना पोलाईट स्पोर्ट्स क्लब चे राहुल आरवाडे, युसुफ जमादार, प्रितेश कोठारी, अमित फारणे ,चेतन पडियार, गणेश कुकडे ,विजय वावरे, धनंजय डुबल यांचे मागदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top