सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील उमदी गावात, समता अनुदानित आश्रम शाळेतील जवळपास 100 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा.--

0


 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

दि.28 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार ,

 उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील  समता अनुदानित (VJNT साठीची) आश्रमशाळेतील जवळपास 100 विद्यार्थ्यांना रविवारी दि. 27 रोजी रात्री उशिरा अन्नातून विष बाधा (food poisoning) झाल्याची माहिती समोर आली आहे. सदर विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.

दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढीलप्रमाणे अपडेट आहेत. त्यानुसार, 

मा.शल्य चिकित्सक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,ग्रामीण रुग्णालय, जत येथे 47,ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ येथे 20,ग्रामीण रुग्णालय,कवठे महांकाळ येथे 41,दाखल करण्यात आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज कडून प्राप्त माहितीनुसार,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे 26,असे जवळपास 134 विद्यार्थी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली, धोक्याबाहेर आहे. परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

माडग्याळ, जत, कवठे महांकाळ व मिरज या चारही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.आरोग्य उपसंचालक, कोल्हापूर आज दुपारी मिरज येथे भेट देणार असल्याचे मा. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी म्हटले आहे.मा.जिल्हाधिकारी यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारात कोणतीही उणीव ठेवू नये,अशा सूचना त्यांनी मेडिकल कॉलेजची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, मा.जिल्हाधिकारी यांनी सहायक आयुक्त,समाजकल्याण यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषीवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

सर्व शासकीय/अनुदानित/ विना अनुदानित आश्रमशाळा व्यवस्थापक/मुख्याध्यापक यांना याद्वारे सक्त सूचना देण्यात येत आहे कि असे प्रकार होऊ नये म्हणून सर्वांनी खबरदारी घ्यावी.विद्यार्थ्यांना देण्यात येणारा आहार स्वच्छ,पोषक, आरोग्य दायी व भेसळमुक्त असेल,याची काटेकोर खबरदारी घ्यावी.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top