भारताच्या चांद्रयान -3 च्या मोहिमेच्या ऐतिहासिक विश्वविक्रमाच्या यशाबद्दल, जगभरातून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव. ---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

( अनिल जोशी)

भारताच्या चांद्रयान -3 च्या मोहिमेच्या ऐतिहासिक विश्वविक्रमाच्या यशाबद्दल,जगभरातून भारतावर अभिनंदनाच्या वर्षावाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी,भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अभिनंदन केले आहे. दुसरीकडे युनायटेड किंगडम च्या अंतराळ संस्थेने,भारताने आज इतिहास रचल्याचे आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. दरम्यान चंद्रावर अलगद उतरण्यासाठी भारताने नव्या तंत्रज्ञानाचे दर्शन घडवले असल्याचे सांगत,युरोपियन स्पेस एजन्सीचे महासंचालक जोसेफ अश्बाशेर यांनी अभिनंदन केले आहे. आम्हाला ब्रिक्स परिवारातील सदस्य असलेल्या भारताच्या या क्षणाचा प्रचंड अभिमान वाटत असल्याचे, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अभिनंदनपर संदेशात म्हटले आहे. 

विज्ञान व अवकाश तंत्रज्ञानातील भारताने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत,नेपाळचे प्रधानमंत्री पुष्पककमल दहल यांनी अभिनंदन केले आहे. संपूर्ण विश्वाच्या मानव जातीसाठी हा महत्त्वाचा क्षण असल्याचे, ब्रिटनचे भारतातील उच्चायुक्त अलेक्स एलिस यांनी म्हटले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेचे प्रमुख एनिको पालेर्मो यांनी तर, चांद्रयान -3 चे चंद्रावरील यशस्वी सफर, प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. भारताच्या या यशामुळे दक्षिण आशियातला शेजारी देश म्हणून,आपल्याला अतिशय आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया मालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहीद यांनी दिली आहे. एकंदरीतच भारताच्या अंतराळ संशोधनातील चंद्रावरचे रहस्य उलगडणाऱ्या चांद्रयान -3 च्या यशस्वी यशोगाथेबद्दल, जागतिक स्तरावर दबदबा प्रतिबिंबित झाल्याचे दिसून आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top