कोल्हापूर- मुंबई "वंदे भारत" रेल्वे गाडीला, सांगली स्थानकावर थांबा वगळल्यामुळे, रेल्वे प्रवाशात प्रचंड नाराजी ,सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्यावर अन्यायकारक निर्णय. --

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रसिद्ध असलेल्या वंदे भारत रेल्वेसाठी, कोल्हापूर- मुंबई दरम्यान असलेल्या थांब्यामध्ये, सांगली रेल्वे स्थानकाचा थांबा वगळण्यात आल्याची माहिती अधिकृत सूत्रांकडून समजल्यावर, रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. कोल्हापूर- मुंबई मार्गाचे वंदे भारत रेल्वे गाडीसाठी प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झाले असून, त्यासाठी थांबे देखील निश्चित करण्यात आले आहेत. सांगली रेल्वे स्थानक हे सांगली जिल्ह्यासाठी एक प्रमुख स्थानक असून, रेल्वे प्रवाशांच्या संख्येत देखील फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊन, सर्व निकष पूर्ण होण्यासाठी कोणतीही अडचण असण्याचे कारण नाही. 

भारताच्या उत्तर व दक्षिण भागात जोडणाऱ्या रेल्वे गाड्यांना, सांगली रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी माझी सुरुवातीपासूनची भूमिका आग्रही असून, वंदे भारत रेल्वे साठी देखील ,सांगली स्थानक थांबा अधिकृत होण्यासाठी, मी आग्रही राहील असे प्रतिपादन खासदार संजय पाटील यांनी केले आहे. दरम्यान रेल्वे प्रशासनाने देखील, सद्यस्थितीत रेल्वे प्रवाशांच्या संख्येत फार मोठी वाढ होत असलेल्या सांगली रेल्वे स्थानकाला ,वंदे भारत रेल्वे साठी थांबा डावलण्याचे कारण काय?. सांगली जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली रेल्वे स्थानकाला, वंदे भारत या रेल्वेसाठी सांगली रेल्वे स्थानक थांबा आवश्यक असल्याचे नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांनी म्हटले आहे. कोल्हापूर -मुंबई वंदे भारत एक्सप्रेस गाडीला, सांगली रेल्वे स्थानकाला थांबा मिळण्यासाठी, रेल्वे प्रवासी संघटनांनी देखील मागणीचा जोर धरला असून, वेळप्रसंगी आंदोलन करण्याच्या तयारीत  असल्याचे समजते . रेल्वे प्रशासनाकडून आज पर्यंत, सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सांगली रेल्वे स्थानकास, कायम दुजाभावाची वागणूक मिळत असल्याबद्दल रेल्वे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे .सांगली रेल्वे स्थानक हे जंक्शन नसल्याचे कारण दिले गेले तर,अशी कित्येक देशात रेल्वेस्थानके असून, की जी रेल्वे स्थानके जंक्शन नाहीत, पण वंदे भारत गाडीला थांबा देण्यात आलेला आहे .सांगली जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन, सांगली रेल्वे स्थानकाच्या बाबतीत रेल्वे प्रवाशांच्या वर होत असलेल्या वारंवार अन्यायाबाबत,सर्व राजकीय मतभेद विसरून जोरदारपणे आवाज उठवून, प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सध्या तरी दिसत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top