राज्य बॉक्सिंगमध्ये "तिहेरी मुकुट"

0


- मोटे स्पोर्ट्स अँकॅडमी, वसगडेच्या बॉक्सरनी केली ३ पदकांची कमाई.

- नागपूर येथे पार पडली राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा.

कोल्हापूर : ("जनप्रतिसाद न्युज" - विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली).

मोटे स्पोर्ट्स अँकॅडमी, वसगडेच्या बॉक्सरनी ३ पदकांची कमाई करून तिहेरी मुकुट पटकावला. या पदकाच्या कमाईमुळे कोल्हापुरचा नावलौकिक राज्यपातळीवर पोहोचला आहे. या यशस्वी कामगिरीमुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 सदर सब ज्युनियर मुले व मुलींच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा नागपूर येथे दिनांक 22 ते 26 जुलै 2023 या काळात  पार पडल्या. सदर स्पर्धेमध्ये पूर्वा मलकर हिने 49-52 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक तसेच वेदांत पवळे याने 49-52 किलो वजन गटामध्ये रौप्य पदक तर 32 ते 35 किलो वजन गटामध्ये करण माळी याने कांस्य पदकाची कमाई केली. 

 हे सर्व खेळाडू मोटे स्पोर्ट्स अँकॅडमी, वसगडे.मध्ये प्रशिक्षक प्रा.प्रशांत मोटे, गौरव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत. त्यांना बापूसाहेब पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक शांतीसागर पाटील तसेच पोलिस पाटील संजय पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष शशीकिरण हेरवाडे, सरपंच योगिता बागडी,उपसरपंच, ग्रामपंचायत सर्व सदस्य, मार्गदर्शक सुनील पाटील,माऊली फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आदींचे प्रोत्साहन व मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top