टेरिटरी" चित्रपटात "नरभक्षक वाघाची" एक थरारक स्टोरी -चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन श्रीराम यांची माहिती..

0


- नरभक्षक वाघाच्या शोधाची चित्त थरारक उलगडणार कहाणी

- 01सप्टेंबर 2023 ला होणार चित्रपट प्रदर्शित

( जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क : विशेष प्रतिनिधी नंदकुमार तेली)

नरभक्षक वाघाच्या शोधाची चित्त थरारक कहाणी उलगडणारा व अंगावर रोमांच उभे करणारा "टेरीटरी" चित्रपट...! या चित्रपटाचा टेलर सोशल मीडियावर लॉन्च झाला असून, 01सप्टेंबर 2023 ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशी माहिती "टेरिटरी" चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- हा चित्रपट प्रदर्शित होणार 01 सप्टेंबर 2023 ला ...

विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा जंगलात, नरभक्षक झालेल्या वाघाच्या शोधाची थरारक व अंगावर रोमांच आणणाऱ्या कहाणी उलगडणारा, "टेरिटरी" या चित्रपटाचा टेलर ,सोशल मीडियावर नुकताच लॉन्च करण्यात आला असून, दि. 01 सप्टेंबर 2023 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपट आज झाला "सोशल मीडियावर लॉन्च"....

जंगलातील नरभक्षक झालेला वाघ जंगलातूनच गायब होतो, व शेवटी नरभक्षक वाघाला ठार मारण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी घेतली जाऊन, एक अंगावर रोमांच असणाऱ्या थरारक शोध मोहिमेस सुरुवात होती, अशी पार्श्वभूमी असलेला, उत्कंठा वाढवणारा, चित्रपट आज सोशल मीडियावर लॉन्च झाला.

चित्रपट "टेरिटरी" टीम...

चित्रपट "टेरिटरी" याचे दिग्दर्शक सचिन श्रीराम असून, चित्रपटात अभिनेते संदीप कुलकर्णी किशोर कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत ,शिवाय निर्माते म्हणून डिव्हाईन टच प्रोडक्शन तर्फे श्रीराम मूल्लेमवार आहेत. चित्रपट "टेरीटेरी" याचे लेखक- दिग्दर्शक सचिन श्रीराम यांनी फिलिपिन्स मधील इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन मधून चित्रपटाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतल्यानंतर, चित्रपटसृष्टीत "टेरिटरी" या चित्रपटातून पदार्पण करीत आहेत. 

आत्तापर्यंत चित्रपट ...! 

"टेरिटरी" हा, कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल गंगटोक, इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ,ग्रीन अकॅडमी अवॉर्ड्स, फार्म फिल्स अवॉर्ड्स अशा विविध आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला असून, विविध पारितोषिक प्राप्त झालेला सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. चित्रपट "टेरिटेरी"याचे छायांकन कृष्णा सोरेन यांनी केले असून, संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. तसेच ध्वनि आरेखन महावीर संब्बनवार व चित्रपट " टेरिटेरी"या चित्रपटास यश पगारे यांनी सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीत दिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top