युवा पत्रकार संघाचा, दिल्लीचा अभ्यासात्मक झुंझावाती दौरा पार पडून ,कोल्हापूर येथे पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

 युवा पत्रकार संघाचा नुकताच दिल्ली अभ्यासात्मक दौरा संपन्न झाला. युवा पत्रकार संघाच्या वतीने आज दिल्लीच्या अभ्यासात्मक दौऱ्यानंतर, सांगली व कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक कोल्हापुरात पार पडली.  युवा पत्रकार संघाच्या बैठकीत विशेषत्वाने ग्रामीण गावातील पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या सोडवण्यासाठी, एक समिती स्थापन करण्यात आली असून,युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्या शासन दरबारी सोडवण्यासाठी, यापुढे विशेषत्वाने प्रयत्न करणार असल्याचे बैठकीदरम्यान सांगितले.  युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली दौऱ्यावर असताना, संसद भवन, राष्ट्रपती भवन, सूचना भवन, महाराष्ट्र परिचय केंद्र, राष्ट्रीय मानव अधिकार आयोग, भवन शाळा, मोहल्ला क्लिनिक, इंटरनॅशनल विमानतळ, मेट्रो स्टेशन, लाल किल्ला, जामा मशीद ,मीना बाजार, मॉल, प्रेस क्लब ऑफ इंडिया आदी ठिकाणी संस्थेच्या अभ्यासात्मक कार्यासाठी भेट दिली. 

 युवा पत्रकार संघ हा संपूर्ण महाराष्ट्र कार्यरत असून, ग्रामीण भागातील पत्रकारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या समस्यांचा अभ्यास करून, शासन दरबारी अनेक योजना तयार करण्यासाठी व त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी, युवा पत्रकार संघटनेच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जातील असे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव शिंगे यांनी माहिती दिली.   युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या दिल्ली अभ्यासात्मक दौऱ्यावेळी ,राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दिल्लीच्या भेटीदरम्यान, ज्ञानेश्वर मुळे यांची भेट होऊन, त्यांना पत्रकार संघाच्या कार्याबद्दल व समस्यांबद्दल अवगत करण्यात आले. महाराष्ट्र राज्यभर जे युवा पत्रकार संघाचे सभासद आहेत, त्यांना अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी व महाराष्ट्र भर युवा पत्रकार संघाच्या शाखा स्थापन करून, सभासद संख्या वाढवण्यासाठी, विशेषत्वाने यापुढे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील असे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी नमूद केले आहे.महाराष्ट्र राज्यातील अतिशय दुर्गम भागामध्ये असलेल्या गावांमध्ये व वाड्यांमध्ये शासनाच्या काही योजना पोचवण्यासाठी व मिळवून देण्यासाठी, युवा पत्रकार संघाचे योगदान अमौलिक असल्याचे  युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी  बैठकीदरम्यान विशद केले. एकंदरीतच आजची झालेली कोल्हापूर व सांगली युवा पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, अत्यंत खेळीमेळीत व अतिशय उत्साहात पार पडली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top