कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे शोध पथकास, चोरीच्या गुन्ह्याप्रकरणी,सोन्याचे 7 तोळे दागिने,मोबाईल व रोख रकमेच्या मुद्देमालासह,एका संशयित इसमास अटक करण्यात यश.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

कोल्हापुरात शाहूपुरी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हे शोध पथकास ,मध्यवर्ती बस स्थानक कोल्हापूरवर झालेल्या,फिर्यादी  अश्विनी सतीश खांबे वय 32 रा.इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगली यांच्या चोरी प्रकरणी,संशयित इसम प्रताप विलास बागल, वय 50, रा.2 गल्ली, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर यास, 7 तोळे सोन्याचे अलंकार असलेले दागिने, मोबाईल, रोख रक्कम रुपये 4000/- मुद्देमालासह अटक करण्यात यश आले आहे.

कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानकावर फिर्यादी अश्विनी सतीश खांडे, वय 32,रा. इस्लामपूर, ता.वाळवा,जि.सांगली या,त्यांचे भाऊ सुमित पाटील यांचे सह,दि. 9/ 5 /2023 रोजी कोल्हापूर ते इस्लामपूर बस प्रवास करणार होते.त्यावेळी बस मधील जागा धरण्यासाठी खिडकीत त्यांनी आपली पर्स टाकली असता, ती अज्ञात व्यक्तीने चोरी केल्याचे निष्पन्न झाले.त्याप्रमाणे कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात मध्ये गु.र.नं. 541/ 2023, भा.द.वि.स. कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.सदरहू गुन्ह्याचा तपास चालू असता, दि. 25/ 9 /2023 रोजी शुभम संकपाळ व लखनसिंह पाटील यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली असता,कोल्हापुरातील स्वामी समर्थ मंदिर,रूईकर कॉलनी, कोल्हापूर येथे,एक अज्ञात इसम चोरीच्या दागिन्यासह मुद्देमाल घेऊन विकण्यासाठी येणार असल्याचे समजले वरून,सापळा लावला असता,संशयित एक इसम,चोरीच्या गुन्हे प्रकरणातील सर्व मुद्देमालासह पकडला गेला.सदरहू संशयित इसमाने सुरुवातीस उडवा उडवीची उत्तरे दिली असून,पोलिसी खाक्या दाखविताच, सदरहू संशयित इसमाचे नाव प्रताप विलास बागल, वय 50, रा. 2री गल्ली, उजळाईवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर असल्याचे निष्पन्न झाले व त्यास 7 तोळ्याचे अलंकार असलेले दागिने, मोबाईल व रोख रक्कम 4000 सह एकूण रक्कम रुपये 2,50,000 किमतींच्या मुद्देमालासह अटक करण्यात यश आले आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक महेंद्र पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांचे सूचनेप्रमाणे,पोलीस निरीक्षक अजय सिंदकर,यांचे मार्गदर्शनाखाली,पी.एस.आय.प्रमोद चव्हाण, सहाय्यक फौजदार संदीप जाधव, पोलिस आमदार संजय जाधव, मिलिंद बांगर, विकास चौगुले,शुभम संकपाळ,लखन पाटील, बाबासाहेब ढाकणे,रवी आंबेकर,महेश पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.कोल्हापूर शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या गुन्हे शोध पथकास,चोरीच्या गुन्ह्याच्या प्रकरणी उकल करण्यात मिळालेल्या यशामुळे, सर्वच सहभागी असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top