मुंबईमध्ये सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग खारघर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) व सौ वृषाली देशमुख (सचिव) यांना, "ABP" न्यूज चॅनलचा "अनमोल रत्न" पुरस्कार प्रदान.!

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

मुंबईमध्ये काल सरस्वती एज्युकेशन सोसायटी संचलित, खारघर नवी मुंबई चे सरस्वती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग खारघर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (बाबा) व सौ.वृषाली देशमुख (सचिव) यांना, शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ,ABP माझा न्युज चैनल च्या वतीने देण्यात येणारा ,"अनमोल रत्न" पुरस्कार दिला गेला आहे. दरवर्षी ABP माझा न्युज चैनल च्या वतीने, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल ,महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी देखील ABP माझा न्युज चैनल च्या वतीने,महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्कार हा,माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व सौ.वृषाली देशमुख यांना शैक्षणिक क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल देण्यात आला आहे.

काल झालेल्या ABP माझा न्युज चैनल च्या वतीने झालेल्या महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्काराचे वितरण समारंभास, महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत,सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी, ABP माझा न्यूज चैनल चे संपादक राजीव खांडेकर हे उपस्थित होते व त्यांच्या उपस्थिती सदरहू पुरस्कार मुंबईमध्ये काल प्रदान करण्यात आला. मुंबईमध्ये झालेल्या ABP माझा न्युज चैनल च्या महाराष्ट्र अनमोल रत्न पुरस्काराच्या कार्यक्रमास,फार मोठ्या संख्येने शैक्षणिक क्षेत्रातील,राजकीय क्षेत्रातील,सहकार क्षेत्रातील व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top