सांगली बलभीम व्यायाम शाळेच्या गणपती विसर्जनाची मिरवणूक, जुन्या लोप पावत असलेल्या,अप्रतिम डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या, पारंपारिक कलेच्या लेझीम व लाठीकाठीच्या खेळाने संपन्न.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत गेली 30 वर्षे बलभीम व्यायाम शाळेच्या गणपतीची मिरवणूक ही,जुन्या पारंपारिक पद्धतीने लोप पावत असलेल्या लेझीम व लाठीकाठीच्या खेळांचे पुनर्जीवन व प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे. सांगलीतील बलभीम व्यायाम शाळेच्या गणपतीची स्थापना सन 1913 साली होऊन, आज गेली 110  इतके वर्षे झाली आहेत.सध्याचे जिकडे पहावे तिकडे राज्यात गणपती उत्सवाच्या मिरवणुकीचे स्वरूप दिशाहीन होत असताना, प्रबोधन रूपाने सामाजिक जाणिवांची जाण ठेवून,जुन्या काळातील लोप पावत असलेल्या कलेच्याद्वारे आज लेझीम व लाठीकाठीच्या खेळनी संपन्न अशा मिरवणुकीचे आयोजन बघून,सांगलीकर खरोखरच आनंदीत- उत्साहीत झाले आहेत. 

सांगलीतील बलभीम व्यायाम शाळेच्या मिरवणुकीत,बाळ गोपाळ ते मध्यमवयीन मुलांचे-मुलींचे,एकाच रंगाच्या लक्षवेधक ड्रेसमध्ये, लेझीम पथक व लाठी काठी खेळणाऱ्या पथकांची दृश्ये,अतिशय मनोहर- अप्रतिम आहेत. गेली अनेक वर्ष बलभीम व्यायाम शाळेचा हा उपक्रम,गणेशोत्सवाची मिरवणूक कशी असावी? त्यासाठी एक प्रबोधन व्हावे,पारंपारिक परंपरेची कल्पना रुजावी, सामाजिक जाणिवांची कल्पना यावी व एकत्रीकरणाने समाजामध्ये जुन्या कलेचा अविष्काराचा मिलाफ साधता येणारी सुंदर किनार लाभावी अशा उद्देशाने चालू आहे.खरोखरच राज्याने या गणेशोत्सव मिरवणुकीचा एक आदर्श घ्यावा अशी लक्षवेधी- नयन मनोहर मिरवणूक म्हणावी लागेल. 

सांगलीतील बलभीम व्यायाम शाळेचे अध्यक्ष गजानन शिंदे हे आहेत.राज्यातील अशा संस्कृतिक पारंपारिक कला-क्रीडा जपणाऱ्या गणेशोत्सव मंडळाना,आर्थिक मदत देऊन, खरोखरच जुन्या कला- क्रीडा जपाव्यात असे वाटते. राज्यातील जिल्ह्यांमध्ये, जिल्हास्तरीय, जुन्या पारंपारिक कला लोप पावत असलेल्या खेळांचे पुनर्जीवन करण्यासाठी,स्पर्धा


करून पाऊल उचलावे असे वाटते. सांगलीतील बलभीम व्यायाम शाळेचा गणेशोत्सव मिरवणुकीत, जुना पारंपारिक कला - क्रीडा जपण्याचा उपक्रम,स्तुत्य- अभिनंदन व कौतुकास्पद असून,त्याची प्रशंसा किती करावी? याला मोल नाही.

आजच्या नवीन जमान्याच्या काळात,पारंपारिक कलांना गणेशोत्सव मिरवणुकीत स्थान मिळावे,दिशाहीन गणेशोत्सव मिरवणुकीचे स्वरूप बदलावे,यासाठी आम्ही ही बातमी प्रसारित केली आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top