कोल्हापुरातील आदर्शव्रत समाजरत्न आजम जमादार यांच्या समाजकार्याविषयी एक सोनेरी दृष्टिक्षेप व कार्याला सलाम.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापुरातील समाजकार्याचा वसा घेतलेले सर्वांचे लाडके आणि आदर्श असे व्यक्तिमत्त्व म्हणजे...आजम जमादार. कोल्हापुरातील आजम जमादार यांचा जन्म,दि. 3/5/1980 साली झाला असून, ते गेली 30 वर्षे," सिटीजन मंडप डेकोरेटर्स" या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

सर्वसामान्यांचा आधार, आणि मनात असणारी प्रामाणिक तळमळ यामुळे गेली 10 वर्षे सतत समाजसेवेत आपल्या कर्तुत्ववाने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. आपला माणूस म्हणून लोकांनी शिक्कामोर्तब केलेलेच आहे. खेळाडूंना आर्थिक मदत,त्यांचे मनोबल वाढवण्याचे प्रयत्न, गोरगरिबांचा वाली, समाजातल्या तळागाळातील गरजूपर्यंत मदत पोहोचवणारे असे कणखर नेतृत्व,पण मनाने हळवे ही त्यांची ओळख.लोकांच्या अडचणी सोडवणे हेच त्यांचे ध्येय आहे.डीडी ग्रुप परिसरात पाण्याची समस्या होती,तिथे त्यांनी स्वखर्चाने पाण्याची बोअर मारून दिली.आणि तहानलेल्यांची तहान भागवली.आणि लाखो आशीर्वाद त्यांना मिळाले.कोल्हापूर ला महापुरामध्ये त्यांनी लोकांना अन्नदानाबरोबर त्यांचे निवाऱ्याचेही प्रश्न सोडवले. त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरात लोकांना राहायला दिले.गोरगरीब विद्यार्थी आणि शालेय शिक्षणापासून वंचित घटकांसाठी त्यांची सामाजिक बांधिलकी गौरवण्यासारखी आहे.पण यांचे समाजकारण करणे हे प्रसिद्धीसाठी नव्हे तर लोक कल्याणासाठी गौरवण्यासाठी आहे. रोटी डे असो वा गणेशोत्सव सगळ्या मंडळांना त्यांच्याकडून मंडपाची मदत ठरलेली असतेच.नवरात्र उत्सव तर त्यांच्यासाठी पर्वणीच. शिवजयंती मोठ्याने साजरी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. या सर्व कार्यक्रमांना घातलेल्या मंडपाचे त्यांनी कधीही पैसे घेतले नाहीत.ते सदैव सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहिले आहेत.

गोरगरिबावर दुःखाचे प्रसंग आले तर त्या कुटुंबाच्या पाठीमागे ते गंभीरपणे उभे राहतात.सतत कार्यरत आणि परोपकारी वृत्तीमुळे नेहमीच ते चर्चेत असतात. सर्वसामान्यांसोबत ते आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात.या दिवशी अवनी सारख्या संस्थेच्या अपंग बांधवांना व्हीलचेअर, कुबड्या,श्रवण यंत्र,गरीब महिलांना साडी वाटप,विद्यार्थी गरजूंना गणवेश वाटप,खाऊ वाटप एक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपतात.

असे सर्वसामान्यांचा आधारस्तंभ असणारे आजम जमादार आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने एक यशस्वी व्यावसायिक तर आहेतच.आणि सामाजिक कार्यात असणारे सातत्य यामुळे त्यांची यशस्वी राजकीय वाटचाली सुरू आहे.याचेच फळ म्हणून त्यांची देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजप या राष्ट्रीय पक्षाची अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.अशा या कोल्हापुरातील आदर्शव्रत असलेल्या समाजरत्न आजम जमादार यांच्या सोनेरी दृष्टिक्षेपातील समाजकार्यास सलाम.व त्यांच्या पुढील समाजकार्याच्या कारकिर्दीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top