सांगली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये,जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत, बऱ्याच कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश.---

0


जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीत शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत, बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असून,यामध्ये राहुल बापट, विशाल पवार ,अजय नाटेकर, अनिकेत साबळे, शुभम संभाळे, ऋषिकेश हारके, अभिषेक गवळी, अभिषेक सुतार, सौ.राणी भट, सौ. कल्पना माने आदी प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्यावर नितांत श्रद्धा ठेवून, त्यांना दैवत मानून महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत तळमळीची कार्य करण्याची इच्छा व्यक्त करत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत, शहर अध्यक्ष दयानंद मलपे, उपशहर प्रमुख सागर कोळेकर यांच्या उपस्थितीत,आज बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पक्ष प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मधील राहुल बापट यांनी आपल्या भाषणात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाच्या मागील मनोगतामध्ये सांगितले की,- महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीतील महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न,सर्वसामान्य जनतेची होणारी परवड,सांगली शहरातील आरोग्याच्या समस्या, सुशिक्षित युवकांच्या नोकरी बाबतीतल्या समस्या, सांगली शहरातील प्रशासकीय अवस्थेमधील भोंगळ कारभार आदीविरुद्ध आवाज उठवून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी, वाचा फोडण्यासाठी,आम्ही आज मोठ्या संख्येने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे.आमचे दैवत असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे साहेब यांच्या आज्ञेत राहून यापुढे, महाराष्ट्रातील तसेच विशेषतः सांगली शहरातील जनसमान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे व वाचा फोडण्याचे काम आम्ही सर्व कार्यकर्ते करणार आहोत. 

सांगली शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये राहुल बापट, विशाल पवार, अजय नाटेकर, अनिकेत साबळे, शुभम संभाळे, ऋषिकेश हारके, अभिषेक गवळी, अभिषेक सुतार, सौ. राणी भट, सौ. कल्पना माने आदी मान्यवरांचा समावेश असून, इतरही बऱ्याच कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. आजच्या झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये झालेल्या बऱ्याच कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे सांगली शहर व जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये एक उत्साहवर्धजनक वातावरण निर्माण झाले आहे. 

आज सांगली शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयामध्ये झालेल्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत शहर प्रमुख दयानंद मलपे उपशहर प्रमुख सागर कोळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top