सांगलीतील बापट बाल शिक्षण मंदिर मधील बाळ गोपाळांच्या श्री गणरायाचे मोठ्या उत्साहाने आगमन.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीतील बापट बाल शिक्षण मंदिर शाळेमधील बाळ गोपाळांच्या श्री गणरायाचे आज,सोमवार दि. 18/ 9/ 2023 रोजी शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने व अप्रतिम मिरवणुकीने आगमन झाले.श्री गणरायाच्या मिरवणुकीमध्ये,इयत्ता 3 री व 4 च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी,पारंपारिक वेशभूषा मध्ये घेतलेला सहभाग,विशेष लक्ष वेधून घेत होता.3 री व 4 च्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी, छत्रपती शिवाजी महाराज,शूरवीर बाजीप्रभू देशपांडे,शूरवीर तानाजी मालुसरे,यासारख्या थोर वीरपुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या.श्री बापट बाल शिक्षण मंदिर या शाळेची दरवर्षीप्रमाणे निघालेली श्री गणरायाची मिरवणूक,ही एक विशेष लक्ष वेधून घेणारी आगळीवेगळी ठरली आहे.

श्री गणरायाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी, बाळ गोपाळ यांचे ध्वज पथक,झांज पथक,लेझीम पथक होते व त्यानंतर सुंदर अशा सजवलेल्या पालखीमध्ये श्री गणरायाची मूर्ती विराजमान झालेली होती. बाल शिक्षण मंदिर मधील इयत्ता 3 री चे व 4 थीचे विद्यार्थी- विद्यार्थिनी,फार मोठ्या संख्येने मिरवणुकीस पारंपारिक वेशभूषा मध्ये हजर होते.सकाळी ठीक 8:00 वाजता श्री बापट बाल शिक्षण मंदिर शाळेतून मिरवणुकीस सुरुवात होऊन,मिरवणूक नवसंदेश बोळ- हरभट रोड- आपटे फुलवाले- विसावा चौक- सिटी हायस्कूल या मार्गे येऊन,शेवटी शाळेमध्ये श्री गणेशाचे आगमन झाले. 

आज बापट बाल शिक्षण मंदिर मधील श्री गणरायाच्या मिरवणुकीत,शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुजाता कांबळे, पर्यवेक्षक सपकाळ सर,पर्यवेक्षिका सौ.माधुरी गुजर,शाळेतील सर्व शिक्षक वर्ग,सेवक वर्ग व शाळेतील विद्यार्थी- विद्यार्थिनी याशिवाय पालक वर्ग उपस्थित होता.आजची सांगलीतील श्री बापट बाल शिक्षण मंदिर शाळेची श्री गणरायाची मिरवणूक अतिशय अप्रतिम नयना मनोहर अशी झाली.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top