देशातील चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल दिला जाणारा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार, चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांना जाहीर.-- केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशातील सर्वोच्च प्रतिष्ठेचा चित्रपटसृष्टीतील समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार,चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री वहिदा रहमान यांना,2021 या वर्षासाठीचा असलेला जाहीर करण्यात आला आहे,अशी माहिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज दिल्ली येथे दिली. 

ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांचे आजपर्यंत अनेक गाजलेले चित्रपट असून, बिवी और गुलाम ,कागज के फूल, गाईड, प्यासा साहब, चौदहवी का चांद हे विशेषतः त्यांच्या कारकिर्दीतले यशस्वी गाजलेले चित्रपट होय.चित्रपट सृष्टीत त्यांनी स्वतःच्या एक वेगळ्या अभिनयाच्या शैलीची ओळख व ठसा,चित्रपट रसिकांच्या मध्ये उतरवला आहे.त्यानुसार नीलकमल,खामोशी आदी रंगीत चित्रपटातूनही त्यांचा चित्रपट रसिकांच्या दृष्टीत वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनय पाहायला ठरला आहे. यापूर्वी रेश्मा और शेरा या चित्रपटात त्यांना सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्या असून,1972 मध्ये पद्मश्री,2011 मध्ये पद्मभूषण,या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख,अभिनेता चिरंजीवी,परेश रावल, प्रसन्नजीत चटर्जी व शेखर कपूर यांच्या निवड समितीने,ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांची निवड केली असून, 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात,देशातील सर्वोच्च समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येईल. दरम्यान मला आत्तापर्यंत विविध पुरस्कार मिळाले असून, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महत्त्व खूप मोठे आहे व हा चित्रपटसृष्टीतील मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल, मला खूप आनंद झाला आहे.त्याचे वर्णन शब्दात करता येणे अशक्य असल्याचे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी काढले आहेत.त्याचबरोबर या यशात ज्या चित्रपटसृष्टीत मुळे मला हा पुरस्कार मिळाला,त्या चित्रपटसृष्टीतील सहकलाकार, निर्माते,दिग्दर्शक या सगळ्यांना मी हा पुरस्कार समर्पित करत असून,माझ्या अभिनयावर चित्रपटसृष्टीतील केलेल्या रसिकांचे हे एक प्रेमाचे हे प्रतीक आहे.या सर्वांचे मी आभार व्यक्त करत आहे असे त्यांनी शेवटी प्रतिपादन केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top