आज पासून ऐतिहासिक नवीन संसद भवनात,संसदेचे संसदीय विशेष कामकाज सुरू.!

0

  जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

   (अनिल जोशी)

आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर ऐतिहासिक नवीन संसद भवनात,संसदेचे संसदीय कामकाज सुरू होत असून,देशाच्या इतिहासातील संसदीय 75 वर्षे कामकाज झालेल्या जुन्या संसद भवनाची कारकीर्द इतिहास जमा होणार आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर नव्या संसद भवनात जय्यत तयारी करण्यात आली असून,विद्यमान 17 व्या लोकसभेतील सर्व खासदारांचे एकत्रित छायाचित्र,जुन्या संसद भवनात काढले जाणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या राज्यघटनेची प्रत सोबत घेऊन, नव्या संसद भवनात आज प्रवेश करतील असे वृत्त आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,जुन्या संसद भवनाला निरोप देताना,आज तेथील ऐतिहासिक स्मृतींच्या गोष्टींना उजाळा दिला असून,सत्ताधारी व विरोधी खासदार यांनी देखील जुन्या संसद भवनाच्या निगडित असलेल्या भावनिक नात्याच्या आठवणी सांगितल्या. आजपासून लोकसभेचे कामकाज नव्या संसद भवनात सुरू होणार असल्याची घोषणा पिठासन अधिकारी ओम बिर्ला यांनी केली असून,राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी सुद्धा राज्यसभेचे कामकाज आजपासून,नव्या संसद भावना सुरू होणार असल्याचे जाहीर केले आहे.आज सकाळी 9:30 च्या दरम्यान,जुन्या संसद भावनाच्या मध्यवर्ती कक्षात, लोकसभा व राज्यसभेचे सर्व खासदार एकत्र येऊन,जुन्या आठवणींच्या स्मृतींसाठी एक छायाचित्र काढणार आहेत. जुन्या संसद भवनामध्ये सर्व खासदारांचे एकत्रित छायाचित्र काढल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दोन्हीही सभागृहाचे पीठासन अधिकारी,दोन्ही सभागृहाचे खासदार एकत्रितपणे नव्या संसद भवनात मिरवणुकीने प्रवेश करतील. 

आज राज्यसभेचे सभागृह नेते व केंद्रीय मंत्री पियुष गोयल, संसदीय काम कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी संसद भवनाच्या तयारीची व पंतप्रधान मोदी यांच्यासह निघणाऱ्या मिरवणुकीच्या  संपूर्ण मार्गाची पाहणी केली आहे.आज पासून ऐतिहासिक जुन्या संसद भवनाचे कामकाज इतिहास जमा होणार असून,नव्या संसद भवनात संसदीय कामकाज सुरू होत आहे हे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top