सांगलीत वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे,अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या,राष्ट्रीय पक्षी गणलेल्या मोराचाअखेर दुर्देवी मृत्यू,मोटार चालक नसल्याने दुचाकीवरून मोराची ससेहोलपट.---

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

सांगलीत आज वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे अत्यवस्थ अवस्थेत असलेल्या,राष्ट्रीय पक्षी गणलेल्या मोराचा अखेर दुर्दैवी अंत झाला असून,वाहन चालक नसल्याने,दुचाकीवरून अत्यावस्थेत असलेल्या मोराची ससेहोलपट झाली आहे. सांगलीतील वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या मोरास,टॉवेलमध्ये गुंडाळून,दुचाकीवरून वनविभागाच्या कार्यालयात आणले होते.वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दुचाकीवरून नेताना,मोराची अखेरची असह्य धडपड,एका इसमाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरा मध्ये चित्रीत केली असून,समाज माध्यमावर सध्या ती व्हायरल झाली आहे.

 दरम्यान राष्ट्रीय पक्षी गणलेल्या मोराचा अशा पद्धतीने सांगलीत मृत्यू होणे,ही एक अनाकलनीय घटना आहे.दरम्यान बेशुद्ध अवस्थेत असलेल्या मोरास उपचार मिळावेत म्हणून,मोटार चालक नसताना,दुचाकीवरून वनविभागाच्या कार्यालयात तातडीने उपचार करण्यासाठी आणले होते,हाच त्यामध्ये उद्देश होता असे सांगलीचे उपवनसंरक्षक डॉ.अजित साजणे यांनी माध्यमांना सांगितले आहे.त्याबरोबरच सांगली वनविभागाकडूनच,राष्ट्रीय पक्षाची अशा पद्धतीने हेळसांड होत असेल तर नागरिकांनी काय आदर्श घ्यावा?,वन्यजीवांची हाताळणी कशा पद्धतीने करावी? वनविभागाचे अधिकृत वाहन नसेल तर,रिक्षा किंवा टेम्पो यासारखे वाहन वापरण्यास काय हरकत होती? याबद्दल अधिकाऱ्यांनी योग्य तो खुलासा करून,संबंधित वन कर्मचाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी. मी स्वतः याबाबतीत तक्रार नोंदवणार असल्याचे,ॲनिमल राहत संघटनेचे कौस्तुभ पोळ यांनी सांगितले आहे.सांगलीतील नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर यांच्या माध्यमातून आज,जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क च्या प्रतिनिधींना ही घटना,अवगत झाली आहे.सांगलीत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कडून,दुचाकीवरून,दयनीय अवस्थेत जखमी असलेल्या मोरास नेण्यात आल्याची चित्रफीत पाहिल्यानंतर, मनास अत्यंत वेदनांचे प्रकटीकरण माध्यमांसमोर झाले आहे. 

सांगलीतील ही घटना कुपवाड मधील पाटील मळ्यातील असून,दुचाकीवरून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून,जखमी अवस्थेत असलेल्या मोरास नेताना,त्याचा पिसारा हा रस्त्यावर घासत असल्याचे दिसत आहे.या संपूर्ण घटनेबद्दल माध्यमांवर आज सांगलीतील वनविभागावर टीकेची झोड उठली आहे. शासनाने याबाबतीत त्वरित लक्ष घालून,सांगली वनविभाग कार्यालयास अद्यावत वाहन उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे असून,या गोष्टीची पुनरावृत्ती घडून न देणे हे शासनाचे कर्तव्य आहे असे वाटते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top