केंद्रीय सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत,कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतीस," कास्य श्रेणीतील" राष्ट्रीयस्तरावरील प्रमाणपत्र.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

भारत सरकारच्या केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने राबवण्यात आलेल्या "सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत" कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायत कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र पुरस्कार विजेती ठरली आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत अटीतटीच्या प्रतिष्ठित असलेल्या स्पर्धेत,महाराष्ट्रातील एकमेव अशा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायतची,कास्य श्रेणीतील प्रमाणपत्र पुरस्कारासाठी पात्र निवड झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव ग्रामपंचायतीची सामाजिक,नैसर्गिक,आर्थिक,सर्व निकषाच्या चौकटीतून,विकासाचा प्रकल्पाचा रथ राबवून,राष्ट्रीय स्तरावरील कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र पात्र ठरली आहे.केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने सर्व राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील जवळपास 750 गावांमधून,फक्त 35 गावाना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देण्यात आला असून,त्यामधील 5 ना सुवर्ण,10 रौप्य व 20 गावांना कांस्यपदक प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथे झालेल्या नुकत्याच कार्यक्रमात,केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अजय भट्ट व पर्यटन सचिव विद्यावती यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला असून,पुणे विभागीय उपसंचालक पर्यटन विभाग क्षमा पवार,महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी,पाटगाव चे सरपंच विलास देसाई,मधपाळ वसंत रासकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे.सदरहू कोल्हापूर जिल्ह्यातील केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम स्पर्धेत,पाटगाव ग्रामपंचायतची राष्ट्रीय स्तरावर कास्य श्रेणीतील प्रमाणपत्रात पात्र ठरल्यामुळे,सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top