नाशिक मध्ये कालच्या अनंत चतुर्दशीच्या श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील D J लेसर शो मुळे गणेश भक्तांना आले अंधत्व,हृदयद्रावक घटना.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

नाशिक मध्ये काल अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील DJ लेसर शोच्या मुळे,गणेश भक्तांना अंधत्व आल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.नाशिक मधील एक प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञांकडे,एक विशीतला तरुण काल अचानक दिसायला कमी झाल्यामुळे आला होता.प्राथमिक तपासणीत त्याची नजर अत्यंत कमजोर झाल्याचे नेत्र तज्ञांच्या लक्षात आले.थोड्याच वेळात डोळ्याचे प्रेशर तपासून नेत्र पाटलाची तपासणी केली असता,नेत्र पटलावर रक्त साखळलेले व नेत्र पटलावर भाजलेला सारख्या जखमा आढळल्या.नेत्र तज्ञांनी त्या अंधत्व आलेल्या रुग्णाकडे चौकशी केली असता तो रुग्ण, कालच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत,DJ च्या लेसर शो वर नाचला असल्याचे समजले. नेत्र तज्ञांनी त्या रुग्णाच्या डोळ्याच्या अंतिम तपासणीसाठी, रेटिनाचा OCT स्कॅन करून, निदान कन्फर्म केले.पुढे दोन तासानंतर आणखी 2 रुग्ण त्या नेत्र तज्ञ डॉक्टरांच्या कडे, डोळ्यांना अंधत्व आल्यामुळे तपासणीसाठी आले.मग मात्र नेत्र तज्ञ डॉक्टरांनी,नेत्ररोग संघटनेकडे चौकशी केली असता, कालच्या अनंत चतुर्दशीच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत, DJ लेसर शो मुळे,5 तरुणांच्या डोळ्यांना अंधत्व आल्याचे स्पष्ट झाले आहे.कदाचित हा आकडा जास्त असण्याची शक्यता वाटत आहे.रुग्णांच्या नेत्र पटलावर DJ लेसर शो मुळे, रेटिना बर्न झाल्याचे हा प्रथमच प्रकार बघितल्याचे,नेत्र तज्ञांनी सांगितले आहे.शिवाय हा एक भलताच प्रकार असल्याचे त्यांना जाणवले आहे.

महाराष्ट्र शासनाने त्वरित DJ लेसर शो वर कायद्याने प्रतिबंधात्मक उपाययोजने,अत्यंत गरजेचे आहे.नाहीतर येणाऱ्या तरुण-तरुणींच्या पिढीला,DJ लेसर शो मुळे झालेला हा नेत्र पटल दोष,त्यांच्या भविष्यातील करिअर साठी किती भयावह असेल?याचा विचार करवत नाही.महाराष्ट्र शासनाने याबाबतीत वेळीच ठोस पावले उचलून,प्रतिबंधात्मक कायदा करावा,अन्यथा लातूरच्या अनंत चतुर्दशीच्या भूकंपाप्रमाणे, अंधत्वाचा भूकंप राज्याच्या तरुण पिढीवर नक्कीच ओढवेल ! यात तीळ मात्र शंका नाही.

सदरहू वृत्त नाशिक मधील डॉ.गणेश भामरे (रेटीना स्पेशालिस्ट),डॉ.सचिन कासलीवाल (नेत्ररोग तज्ञ) व नेत्ररोग तज्ञ संघटना,नाशिक यांच्याकडून संपादन करून जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top