क्लू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह विभाग यांच्यावतीने IPS चंद्रमणी इंदुरकर,व त्यांच्या टीमचा करण्यात आला गौरव.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

   (अनिल जोशी)

"क्लू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह विभाग"या संस्थेची स्थापना दोन वर्षांपूर्वी दिल्लीत सामाजिक जागृतीच्या उद्देशाने करण्यात आली होती,संस्थेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष "ऑगस्टिन जोसेफ गजभिव"आणि त्यांच्या टीमने भारतातील 21 राज्यांमधील 10,000 हून अधिक पदाधिकारी अतिशय कमी कालावधीत जोडले आहेत.ही संस्था गेली 2 वर्षे खाजगी तपास,सामाजिक कार्य, गुप्तचर इत्यादी... आणि गुप्तचर माहिती सरकारी यंत्रणांना देशासाठी पुरविण्याचे मोठे कार्य करत आहे,यासोबतच विविध सामाजिक कार्यांसाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे,अलीकडे या संस्थेच्या वतीने "नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय पुरस्कार" चे आयोजन करण्यात आले होते,ज्यामध्ये पोलीस विभाग आणि भारतीय सैन्यातील निवृत्त अधिकाऱ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते,या महान पुरस्काराचे आयोजन  महाराष्ट्राच्या वीर भूमीत करण्यात आले होते.या कार्यक्रमाला मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.

यावेळी संस्थेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष"ऑगस्टिन जोसेफ गजभिव",IPS चंद्रमणी इंदूरकर (अधीक्षक कारागृह),संजय कुमार कोटेचा (जोनल डायरेक्टर महाराष्ट्र, कर्नाटक), श्रीदेवी पाटिल (असिस्टेंट स्टेट डायरेक्टर "सीआईडीडी" महाराष्ट्र), अविनाश निकाळजे (स्वीय, महाराष्ट्र शासन), अरविंद देशमुख (आदर्श शिक्षक), एंड्रेस गजभिव, मेजर चौधरी सर (भारतीय सेना), रवींद्र मान (भारतीय नौदल) शीलरत्न जगताप,लाजर साळवे, जगन्नाथ खंडागळे, भाऊ मगर, वसंत गजभिव, अजिंक्य गजभिव, अमोल घोलप, शिमोन गजभिव, सुरेश गजभिव, भाऊ मगर, दादासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते...

आदरणीय इंदूरकर सर आणि त्यांच्या टीमला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,संस्थेचे ब्रिदवाक्य "राष्ट्रहित सर्वोपरि"आहे,समाजहित व राष्ट्रहित सर्वोपरी या तत्त्वावर संस्था काम करत आहे,महाराष्ट्रातील 600 निवृत्त लष्करी अधिकारी "क्लू इंटेलिजन्स डिटेक्टिव्ह विभाग"या संस्थेत सामिल झाले आहेत...ही संस्था देशाच्या 21 राज्यात  प्रशासनासोबत कार्य करत आहे...

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top