कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर विश्वनाथ साखरे यांना 01 लाख 10 हजार रुपयांच्या लाच स्वीकारल्या प्रकरणी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोल्हापूर मध्ये काल जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर विश्वनाथ साखरे वय वर्षे 52,रा."आई" बंगला, राजगृह हाऊसिंग सोसायटी, विश्रामबाग सांगली यांना,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 01लाख 10 हजार रुपयांची लाच रंगेहात स्वीकारल्या प्रकरणी अटक केली असून,कोल्हापूर प्रशासनामध्ये सदरहू घटनेमुळे खळबळ उडाली आहे. 

दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने, डॉ.चंद्रशेखर विश्वनाथ साखरे यांच्या सांगलीतील विश्रामबाग येथील बंगल्याची सायंकाळी झडती घेतली आहे.पुण्यातील तक्रारदार असलेल्या एका ठेकेदार व्यक्तीकडून,विविध प्रकारच्या साहित्य पुरवठ्याच्या मंजूर बिलापोटी, रुपये 01 लाख 10 हजार रुपयाची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले असून,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने,मंगळवारी सायंकाळी 4:30 वाजता कार्यालयात, ठेकेदाराकडून 01 लाख 10 हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे.

दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ.चंद्रशेखर विश्वनाथ साखरे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे असे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे यांनी सांगितले आहे.आजच्या झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, संजू बबरगेकर यांनी सहभाग घेतला असून, जुना राजवाडा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top