राजस्थान विधानसभेतील निवडणुकीचे मतदान आता 23 नोव्हेंबर 2023 ऐवजी 25 नोव्हेंबर 2023 रोजी होणार असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतेच 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून,त्यात फक्त आता राजस्थान मधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख 23 नोव्हेंबर 2023 ऐवजी,25 नोव्हेंबर 2023 रोजी करण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला असल्याचे स्पष्ट झाले.केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच 2 दिवसापूर्वी वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली आहे.राजस्थान राज्यात 23 नोव्हेंबरला मोठ्या प्रमाणात विवाहाचा मुहूर्त असल्याने व मोठ्या प्रमाणात विवाह समारंभ ठरले असल्याने, हा बदल केल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार 5 राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.त्यामध्ये आता फक्त राजस्थान मधील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख 23 नोव्हेंबर 2023 ऐवजी 25 नोव्हेंबर 2023 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे.एकंदरीत राजस्थानमध्ये निवडणुकीचा राजकीय रंग चढत चालला आहे.राजस्थान विधानसभा निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार? आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? हे झालेल्या मतदानानंतर कळणार आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top