महाराष्ट्र राज्य शासनाकडून,सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आता,जनता दरबार भरविला जाणार.-- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

महाराष्ट्र राज्य सरकारमधील शिवसेनेच्या 9 मंत्र्यांकडून, सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी,आठवड्यातून 5 दिवस जनता दरबार भरवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिली आहे.महाराष्ट्र सरकारमधील मंत्री महोदय दादा भुसे,उदय सामंत यांनी दर सोमवारी,शंभूराज देसाई,संदिपान भुमरे यांनी दर मंगळवारी,  दीपक केसरकर,तानाजी सावंत यांनी दर बुधवारी,अब्दुल सत्तार,गुलाबराव पाटील यांनी दर गुरुवारी तर संजय राठोड हे दर शुक्रवारी जनता दरबार भरवुन,जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी सांगितले आहे. 

आज मुंबईतील मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात ही माहिती दिली असून,सामान्य जनतेच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी,महाराष्ट्र सरकारने एक उचललेले अतिशय मोठे पाऊल असल्याचे दिसत आहे.महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी,महाराष्ट्र सरकारचा हा एक उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य असून,राज्यातील जनतेचा याला उपयोग होऊन फायदा होईल असे वाटते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top