मुंबईतील दादर येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत,सनातन धर्माला नष्ट करू पाहणाऱ्यांच्या विरोधात,प्रत्येक मंदिराकडून पोलिसात तक्रार दाखल करण्याचा ठराव पारित.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सनातन धर्माला नष्ट करण्याचे ‘हेट स्पीच’ देणारे उदयनिधी स्टॅलिन,प्रियांक खर्गे,ए.राजा आणि निखिल वागळे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करावी,असा प्रस्ताव ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या दादर,मुंबई येथे झालेल्या तिसर्‍या राज्यस्तरीय बैठक पारित करण्यात आला.यासाठी प्रत्येक मंदिर पोलिसांत तक्रार दाखल करणार आहोत.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक,दादर येथे झालेल्या या बैठकीला राज्यातील महाराष्ट्र मंदिर महासंघाचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित होते. ‘जी.एस्.बी.टेंपल ट्रस्ट’ आणि ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे राज्य समन्वयक श्री.सुनील घनवट यांनी बैठकीच्या आरंभी महासंघाच्या वतीने मागील 6 महिन्यांत झालेले उपक्रम,आंदोलने आणि त्यांत मिळालेले यश यांविषयी सर्वांना माहिती दिली.तसेच या वेळी राज्यातील मंदिर विश्वस्तांनीही 6 मासांमध्ये केलेल्या कार्याचा आढावा मांडला. ‘मंदिरे ही सनातन धर्मप्रसाराची केंद्रे आहेत.आज महाराष्ट्रात 175 हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली आहे’,याविषयीचे प्रयत्न अजून वाढवून ही राष्ट्रीय चळवळ निर्माण झाली पाहिजे.हिंदूंची मंदिरे सरकारमुक्त करणे,तसेच मंदिरांच्या जमिनी बळकावण्याच्या वक्फ बोर्डाच्या षड्यंत्राविषयी जागृती करणे,यांसाठी मंदिर विश्वस्तांनी राज्यभर संघटितपणे प्रयत्न करायला हवेत,असे आवाहनही श्री.सुनील घनवट यांनी या वेळी केले.

मंदिरांच्या परंपरांवर होणारे आघात रोखण्यासाठी संघटितपणे लढणे,तसेच सरकारीकरण देवस्थानांतून मोठ्या प्रमाणावर होत असलेली भक्तांची लूट थांबवण्यासाठी जलद पावले उचलणे,यांसाठी एकत्रितपणे कृती करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.तसेच महासंघाच्या पुढील 3 महिन्यांच्या कार्याची दिशाही निश्चित करण्यात आली.या बैठकीत जी.एस्.बी.टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण कानविंदे, सचिव शशांक गुळगुळे,क्षेत्र थेऊर देवस्थान,सिद्धटेक देवस्थान आणि मोरया गोसावी देवस्थान यांचे विश्वस्त ह.भ.प.आनंद महाराज तांबे,अमळनेर (जि. जळगाव) येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले,विदर्भ देवस्थान समितीचे अध्यक्ष अनुप जयस्वाल,नगर येथील श्री अंबिका तुळजाभवानीमाता मंदिराचे अधिवक्ता अभिषेक भगत, तुळजापूर येथील पुजारी संघाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे तथा त्यांचे अधिवक्ता शिरीष कुलकर्णी,पाली येथील श्री बल्लाळेश्वर व देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे आणि व्यवस्थापक चंद्रशेखर सोमण,महड येथील श्री गणपती संस्थानच्या अध्यक्षा सौ.मोहिनी वैद्य, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर,पनवेल येथील श्री श्वेतांबर मूर्तीपूजक जैन संघाचे अध्यक्ष  मोतीलाल जैन,कडाव,कर्जत (जि रायगड) येथील गणपती आणि मारुती देवस्थानचे विश्वस्त विनायक उपाध्ये,अमरावती येथील पिंगळादेवी संस्थानचे अध्यक्ष विनीत पाखोडे,लक्ष्मीनारायण संस्थानचे अशोक खंडेलवाल,हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता पू.सुरेश कुलकर्णी,सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस,हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी उपस्थित होते. 

    महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्यात सहभागी होण्यासाठी 7020383264 या क्रमांकावर संपर्क करावा,से आवाहन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top