कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

मुंबई, दि.17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.कोल्हापुरात 15 ते 24 ऑक्टोबर 2023 दरम्यान सुरु असलेल्या दसरा महोत्सवात विविध उपक्रम, स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रमांचे विनामूल्य आयोजन केले आहे. यामध्ये नागरिक आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री श्री.मुश्रीफ यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील ‘शाही दसरा’ देशभरात प्रसिद्ध असून त्याला ऐतिहासिक वारसा आहे.कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव देश - विदेशात पोहोचविण्यासाठी तसेच पर्यटनदृष्ट्या कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.यासाठी निधीही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. घटस्थापनेपासून सुरु झालेल्या दसरा महोत्सवाला पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाच्या उद्घाटनाने सुरुवात झाली असून या कार्यक्रमांना जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत बुधवार 18 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व'न्यूज ऑन एआयआर' या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे.निवेदक पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top