सांगलीतील खासदार संजयकाका पाटील यांच्या प्रयत्नामुळे,कोरोना काळापासून बंद असलेल्या सह्याद्री एक्सप्रेसच्या वेळेत,सांगली- मिरज मार्गे कोल्हापूर-पुणे विषेश रेल्वे गाडी सुरू.!

0

 सांगली जिल्ह्यात सांगली,मिरज,भिलवडी,किर्लोस्करवाडी व ताकारी या 5 स्थानकांवर या गाडीला थांबा मिळाला....

सांगली जिल्हाचा व पश्चिम महाराष्ट्राचा पुण्याशी संपर्क वाढणार....

शेतकरी, व्यापारी,उद्योजक, डाॅक्टर,विद्यार्थी व आयटी काॅम्प्युटर क्षेत्रात पुण्यात काम करणारे तरुणांना फायदा....

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

पश्चिम महाराष्ट्रात सांगली,कोल्हापूर,सातारा जिल्हातील महत्वाची शहरे व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पुणे,मुंबईला नेणारी लाईफ लाईन नावाने प्रसिद्ध असलेली सह्याद्री एक्सप्रेस गाडी गेली 50 वर्षे अविरत चालू होती.

पण कोरोना लाॅकडाऊन काळात सर्व गाड्यांप्रमाणे सह्याद्री देखील बंद झाली. कोरोना संपल्यानंतर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे विस्तारिकरण सुरू झाल्याने सह्याद्री एक्सप्रेस सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे मुंबई, पुणे जाण्यासाठी गाड्या कमी झाल्याने लोक हैराण होते.

खासदार संजयकाका यांनी दिल्लीत रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव व रेल राज्य मंत्री श्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सह्याद्री एक्सप्रेस पुर्ववत सुरु करण्याची मागणी केली होती व पाठपुरावा गेली 2 वर्षे सुरू होता.

मध्य रेल सलाहगार समितीचे सदस्य उमेश शाह यांनी मध्य रेल मुंबई मुख्यालयात वरिष्ठ अधिकारींची भेट घेऊन खासदारांचे निवेदन देऊन प्रत्यक्ष ही गाडी सुरू करण्याबाबत खासदार आग्रही असून गाडी कशी सुरू होईल याबाबत सविस्तर चर्चा केली. मध्य रेल सलाहगार समिती सदस्य सुकुमार पाटील यांनी रेलवे परिचालन विभागाकडून तांतरीक बाबती समजून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.  शेवटी खासदारांनी रेल मंत्रीशी चर्चा करुन सह्याद्रीच्या वेळेत पुण्यापर्यंत एक गाडी लगेच सुरू करावी व नंतर ही गाडी मुंबईपर्यंत विस्तार करावी ही विनंती केली.

खासदारांची मागणी मान्य करत रेल मंत्रालयाने सह्याद्रीच्या वेळेत सांगली,मिरज,भिलवडी,किर्लोस्करवाडी,ताकारी मार्गे कोल्हापूर-पुणे विषेश एक्सप्रेस गाडी ता.5 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा आदेश काढला.

कोल्हापुर-पुणे विशेष एक्सप्रेस रेलवे गाड़ी कोल्हापुर रेलवे स्टेशनवरुन रोज रात्री 11:30 वा सुटून मिरजेला रात्री 12:35 वा पोहोचेल.पुढे सांगली रेल्वे स्थानकावर रात्री 12:52 वा पोहोचेल.सांगलीतून रात्री 12:55 वा सुटून भिलवडी रात्री 1:15 वा, किर्लोस्करवाडी रात्री 1:30 वा, ताकारी रात्री 1:40 वा सुटेल. पुढे कराड, सातारा, लोणंद, निरा, जेजूरी ईत्यादी ठिकाणी थांबून पुणे येथे सकाळी 7:45 वा पोहोचेल.

पुण्यातून परत येताना रोज रात्री 9:45 वा सुटून जेजूरी,निरा, लोणंद,सातारा,कराड मार्गे ताकारी रात्री 2 वा, किर्लोस्करवाडी रात्री 2:15 वा, भिलवडी रात्री 2:30,सांगली रात्री 2:50, मिरज रात्री 3:15 वा,कोल्हापूर 5:40 वा पोहोचेल.

रेल्वे मंत्रालयाने हे वेळापत्रक खासदारांना पाठवले आहे.

सांगली जिल्ह्यात सांगली, मिरज, भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी या 5 स्थानकांवर या गाडीला थांबा मिळाला आहे ही महत्वपूर्ण बाबत आहे. 

जिल्हाचा पुण्याशी संपर्क वाढणार आहे.

शेतकरी,व्यापारी,उद्योजक,डाॅक्टर,विद्यार्थी व आयटी काॅम्प्युटर क्षेत्रात पुण्यात काम करणारे तरुणांना फायदा होईल. तसेच सांगली शहरातून आपले काम संपवून परतणार्या पलूस,तासगाव,वाळवा,कडेगाव ईत्यादी तालुक्यातील लोकांना परत जाण्यासाठी ही गाडी सुरु झाल्यानंतर मोठी सोय होईल.

जिल्ह्यातील सर्व थरांतून खासदारांचे अभिनंदन होत आहे.

सांगली रेल्वे डेवलपमेंट ग्रुपचे रोहीत गोडबोले यांनी खासदार संजयकाकांचे अभिनंदन केले असून यापुढे सांगली मार्गे सुरु होणार्या कोल्हापूर-मुंबई व भोपाल-बेंगलोर वंदे भारत व ईतर गाड्यांना सांगली जिल्हा मुख्यालय सांगली व उद्योग नगरी किर्लोस्करवाडी येथे थांबा देण्याची विनंती केली.खासदारांनी याबाबतीत पूर्ण ताकद लावून सांगली,मिरज व किर्लोस्करवाडी या तिन्ही स्टेशनवर नविन गाड्यांच्या थांब्याबाबत रेलमंत्रीना भेटून थांबा मंजूर करण्याबाबत आग्रही असल्याचे कळवले.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top