उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांना/ नागरिकांना,शेवग्याच्या झाडाच्या पानाचा काढा पिणे,आरोग्यास अतिशय हितकारक.!

0

 आरोग्य भाग- 2.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

शेवग्याचं झाड अतिशय वेगानं वाढतं.त्याच्या शेंगांबरोबरच पानं,फुलंदेखील खाण्यासाठी वापरली जातात.या झाडाचे हे तीनही भाग खूप फायदेशीर आहेत.शेवग्यामध्ये प्रथिनं, अमीनो अॅसिडस्, बीटा-कॅरोटीन आणि वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉलिक असतात जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरतात.

शेवग्याच्या पानांमध्ये उच्च रक्तदाब (High Blood Pressure) नियंत्रित करण्याचे गुणधर्म असतात.उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी शेवग्याच्या पानांचे पाणी आवर्जून प्यावे.यासाठी एक ग्लास पाण्यात शेवग्याची थोडी पाने टाकून ते पाणी उकळा.पाणी उकळून अर्धे झाल्यावर ते थंड करून घ्या.नंतर ते पाणी गाळून घ्यावं आणि प्यावं.रक्तदाब वाढलेला असेल तेव्हा सलग दोन दिवस हे पाणी प्या.त्यानंतर रक्तदाब कमी झाल्यानंतर हे पाणी दोन दिवसांच्या अंतरानं घ्या.या काळात दररोज आपला रक्तदाब तपासा ज्यामुळं रक्तदाब किती कमी झाला आहे,हे समजेल.त्यानंतर आठवड्यातून एकदा हे पाणी पिणं योग्य ठरेल.ज्या नागरिकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास जास्त असतो,त्यांनी शेवग्याच्या शेंगा खाणे, शेवग्याच्या झाडाच्या पानाचा काढा करून पिणे म्हणजे उच्च रक्तदाब/ हाय ब्लड प्रेशर,कायम नियंत्रित राहण्यास होण्यास मदत होईल.

सदरहू माहिती आरोग्य आणि समर्थ ( सोशल फाउंडेशन)च्या कडून संपादन करून, जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top