सांगली,मिरज आणि कुपवाड शहरासह नदीकाठच्या गावांवर,पाणी कपातीचे संकट येणार नाही अशा पद्धतीने कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करून,मिरज सह पूर्व भागातील तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करा.--काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

कोयना धरणातील पाण्याचे नियोजन करताना शेतीला प्राधान्य द्या आणि सांगली,मिरज,कुपवाडसह नदीकाठची गावे आणि शहरांवर पाणी कपातीचे संकट येणार नाही,याची काटेकोर खबरदारी घ्या.मिरजेसह पूर्व भागातील तालुक्यांना दुष्काळ जाहीर करा,अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केली.काँग्रेसने निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.आमदार विक्रम सावंत हेही जतच्या आंदोलनासोबतच काँग्रेसचे निदर्शनादेखील सहभागी झाले.‘नदी पाणी सोडा,नाहीतर सरकार सोडा’,अशी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

पृथ्वीराज पाटील म्हणाले,की कोयना धरणातील ८९ टीएमसी पाण्यापैकी ३५ टीएमसी पाणी विद्युत निर्मितीसाठी राखीव ठेवले गेले आहे.३५ टीएमसी पूर्वेकडील सिंचन योजनांना देत आहेत.हे पाणी पुरेसे नाही.विद्युत निर्मितीच्या पाण्यात कपात करावी,वीज विकत घ्यावी,आणि शेती व पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे.उपसा सिंचन योजनांवर कपातीचे संकट येता कामा नये.त्यासोबतच मिरज तालुक्यासह जत,आटपाडी, खानापूर,तासगाव,कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा.तो केला नाही तर काँग्रेस तीव्र आंदोलन करेल. जनतेचा क्रोध अनावर होईल.सध्या कृष्णा कोरडी आहे.एक टीएमसी पाणी सोडून काही होणार नाही.दिवाळी तोंडावर आहे.लोकांना पाण्यासाठी संघर्ष करायला लावू नका.’’

सांगली जिल्ह्यात यावर्षी पाऊसकाळ अत्यंत कमी झाला आणि त्याचा परिणाम शेती शेतकऱ्यासह नागरी जीवनाच्या पिण्याच्या पाण्यासह अनेकावर झाला.परिणामी शेती-शेतकऱ्याना अत्यंत गंभिर समस्याना तोंड द्यावे लागते आहे. शेतक-यांच्या जनावरांची वैरण,पाण्याअभावी उपासमार होत असून पशु धनावर आणि शेतक-यांच्या पिक उत्पादनावर दुष्काळामुळे गंभीर परिणाम होत आहेत.कृष्णेचे पात्र वांरवांर कोरडे होत असलेने कृष्णा काठची गावे पाणी टंचाईच्या चक्रात अडकली आहेत म्हैसाळ प्रकल्प ही अडचणीत येत आहे. वाढती महागाई,शेतकरी मालाला कवडीमोल भाव महागाईचा भस्मासूर यामध्ये जिल्हा भरडला जातो आहे.म्हणून आमची शासनाला विनंती की,मिरज तालुक्या सह जत,आटपाडी, खानापुर,तासगाव,कवठेमहांकाळ या तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर करावा.मा.पालकमंत्री महोदयांनी जिल्हातील दुष्काळी तालुक्यांच्या यादीत मिरज व जत तालुक्यांचा समावेश केलेला नाही.तो तातडीने करून करून त्याची अमंलबजावणी व्हावी अन्यथा जनतेचा क्रोध अनावर होईल.

यावेळी प्रा.एन.डी.बिरनाळे,बिपीन कदम,आप्पासाहेब पाटील, मार्केट कमिटी सभापती सुजयनाना शिंदे,सनी धोतरे,बाबासो कोडग,आशिष कोरी,अशोकसिंग रजपूत,अण्णासाहेब कोरे, भारती भगत,मौलाली वंटमुरे,चेतन पाटील,वसीम रोहिले, अय्युब निशाणदार,आशिष चौधरी,रघुनाथ नार्वेकर,दीक्षित भगत,माणिक कोलप,नामदेव पठाडे,राजेंद्र कांबळे,अजित भांबुरे,श्रीधर बारटक्के,अमोल पाटील,सचिन चव्हाण,डी.पी. बनसोडे,याकूब मणेर,मारूती देवकर,प्रशांत अहिवळे,व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

तर कृष्णा नदीच्या पाण्यात उतरून आंदोलन.!

ऐन गणेश उत्सवामध्ये कृष्णेचे पत्र कोरडे पडले. पालकमंत्री, आमदारांचे दुर्लक्ष झाल्याने गणपती विसर्जन शेरीनाल्याच्या पाण्यात करण्याची वेळ आली. आता दिवाळीचे अभ्यंगस्नान तरी कृष्णेच्या पाण्याने करू द्या. पाटबंधारे विभागाने सणासुदीमध्ये कृष्णा कोरडी पडणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अन्यथा कृष्णेच्या पात्रात उतरून आम्ही आंदोलन करू, असा इशारा पृथ्वीराज पाटील यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत तातडीने पाणी सोडण्याची ग्वाही दिली.
Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top