जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत आदर्श विद्यानिकेतन मिणचेला तिहेरी मुकुट.!

0

 जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

सोमवार दि.१६ आक्टोबर रोजी आदर्श विद्यानिकेतन च्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस.घुगरे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी क्रीडा अधिकारी अरुण पाटील नेटबॉल असोसिएशनचे सचिव विनय जाधव डॉ.जयदिप जाधव उपप्राचार्य एम.ए.परीट यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर आदर्श विद्यानिकेतन मिनचे या प्रशालेच्या संघाने 14 वर्ष 17 वर्ष व 19 वर्ष मुलांच्या गटात अजिंक्यपदपटकावत तिहेरी मुकट संपादन केला.विजय संघांची सांगली येथे होणाऱ्या विभागस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.

       14 वर्षा खालील मुले-

सक्षम नाईक,अथर्व तावरे,अथर्व कोकने,समर्थ म्हेत्रे,विश्वजीत पाटील,यशराज खताळे,उदयसिंह भोसले,वर्धन पाटील,उमेश देवाळकर ओमकार जाधव,समर्थ पाटील,श्रेणिक पाटील.

         19 वर्षा खालील मुले- 

हर्ष लोखंडे,पार्श्व पाटील,साहिल पवार,इंद्रजित साळुंखे, मयूर कोकणे,संस्कार शिनगारे,प्रथमेश शिंदे,अथर्व शेटे,शार्वील पाटील.

          17 वर्षा खालील मुले.-

तेजस निकम,संस्कार मते,सुजल शेलार,तनिष्का पाटील,अवधूत नरुते,ओम माली,प्रीतम यादव,हर्षवर्धन पाटील,अभिषेक शिरगुप्पे, श्रीवर्धन बने,अथर्व सोनवणे.

यशस्वी खेळाडूंना संस्थेचे संस्थापक डॉ.डी.एस.घुगरे उपप्राचार्य एम. ए.परीट यांची प्रेरणा लाभली महाराष्ट्र शासन आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील नेटबॉल प्रशिक्षक अजिंक्य चिबडे, तुषार पवार यांचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top