सांगलीतील वसंतदादा शासकीय रुग्णालयासाठी (सिव्हील),येत्या हिवाळी अधिवेशनात आर्थिक तरतूद न केल्यास,सांगली शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची,राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज सांगली येथील वसंतदादा शासकीय रुग्णालयात भेट देवून पाहणी केली. त्यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी ‘येत्या हिवाळी अधिवेशनात सिव्हिलसाठी आर्थिक तरतूद करा.अन्यथा,मला बेमुदत उपोषणाला बसावे लागेल’, असा इशारा दिला. त्याची गंभीर दखल श्री.हसन मुश्रीफ यांनी घेतली असून ‘पृथ्वीराज' तुमच्यावर उपोषणाची वेळ मी येवू देणार नाही.१०० टक्के आर्थिक तरतूद वेळेत केली जाईल’, अशी ग्वाही दिली.त्यामुळे सिव्हिलच्या विकासासाठी आवश्‍यक निधी मंजुरीची रखडलेली प्रक्रिया गतीमान होण्याची अपेक्षा वाढली आहे.  

पृथ्वीराज पाटील यांनी या बैठकीत अनेक महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले.अत्यंत मायक्रो लेव्हलवर सिव्हिलबाबत मांडणी केली.महाविकास आघाडी शासन काळात मंजूर झालेल्या ५०० खाटांचे रुग्णालय,निवासी डॉक्टरांसाठी तीन मजली इमारत आणि अद्ययावत शवागार यासाठी येत्या हिवाळी अधिवेशनात अंदाजपत्रकीय तरतूद करुन निधी वितरीत करावा व काम पूर्ण करावे,अशी मागणी केली.पृथ्वीराज पाटील यांनी केवळ मागणीवर न थांबता यावेळी काँग्रेसला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल,असा स्पष्ट इशारा दिला. ‘मुश्रीफ साहेब तुमचे आमचे संबंध खूप चांगले आहेत,तुमचे काम प्रभावी आहे,मात्र सांगलीकरांच्या आरोग्याचा प्रश्‍न आहे, त्यात हेळसांड होऊ नये.हवे तर इतर कामे बाजूला ठेवा,मात्र आरोग्यासाठी निधी लवकर द्या.सिव्हिलमधील रुग्णांना बाहेरून औषधे आणायला सांगितली जातात.काही तपासण्या बाहेरील लॅब मधून करणेस सांगितले जाते.ते ताबोडतोब बंद व्हावे.अन्यथा,या सामान्य लोकांना सोबत घेवून बेमुदत उपोषण करावे लागेल",असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेसच्या रवी खराडे यांनी सांगली व मिरज सिव्हिल रुग्णालयाचे इलेक्ट्रिक ऑडिट व्हावे.नांदेड व मुंबई रुग्णालयात रुग्णमृत्यूची पुनरावृत्ती सांगली मिरजेत होऊ नये.पोष्टमार्टम रुम व निवासी डॉक्टरना २०० रुम क्षमतेचे होस्टेल उभारणी करावी,अशी मागणी केली.आशिष कोरी यांनी सिव्हिलमधील डॉक्टर खासगी प्रॅक्टिक करतात,त्यावर बंदी घाला,अशी मागणी केली.माजी नगरसेवक रविंद्र वळवडे यांनी लॅब तपासणीच्या चिठ्ठया बाहेर का देतात? खासगी लॅबचा आग्रह का घरला जातो? असा सवाल केला.माजी नगरसेवक अभिजित भोसले यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

कॅन्सर उपचार व्यवस्था अद्यावत करावी,रुग्णांना बाहेरुन औषधे व विविध चाचण्या करायला सांगू नये.हे रुग्णालयातच मिळाले पाहिजे.सीटी स्कॅन यंत्रणा तातडीने सुरू करावी. डॉक्टर व वर्ग ३ व ४ ची रिक्त सर्व पदे तातडीने भरावीत,अशा मागण्या काँग्रेस नेत्यांनी आक्रमकपणे केल्या.ना.मुश्रीफ यांनी ‘उपोषण करण्याची वेळ येऊ देणार नाही.आपण यापूर्वीच आघाडी सरकारच्या काळात व गेल्या आठवड्यात ही सर्व कामे झाली पाहिजेत,अशी समक्ष भेटून मागणी केली आहे. आता मी वैद्यकीय शिक्षण मंत्री आहे. कामं झालेली दिसतील’, अशी ग्वाही दिली.

सांगलीतील सिविल यंत्रणेकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्ह्यात प्रशासनाच्या बाबतीत.-सिटी स्कॅनचे किती दिवस ऐकायचे?

पृथ्वीराज पाटील यांनी सीटी स्कॅन यंत्रणा मंजूर झाल्याचे आम्ही दोन वर्षे ऐकतोय,कधी सुरु होणार हे सांगा?,असा सवाल केला.जिल्हाधिकाऱ्यांनी त्यात हस्तक्षेप करत लवकरच तो विषय मार्गी लागेल,अशी ग्वाही दिली.विविध प्रश्‍नांवर थेट मुद्याला हात घालत श्री.पाटील यांनी सिव्हिलच्या यंत्रणेचा आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हा प्रशासनाचाही पंचनामा केला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top