देशातील सर्व निबंधक कार्यालयांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय !.- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा.

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशातल्या सर्व निबंधक कार्यालयांच्या मध्ये पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीकरण करण्याचा निर्णय केंद्रीय सहकार मंत्रालयाने घेतला असून,त्यासंबंधी निर्णय अंमलात आणण्यासाठी सर्व पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशातील केंद्र सरकारच्या सर्व सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी,अनेक उपायांचा अवलंब करण्यात येत असून, त्यापैकी हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.

 देशभरातल्या एकूण 13 राज्यांमधील कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या अंदाजे 1851 शाखांचे संगणकीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली असून,जवळपास 225 कोटी रुपयांची तरतूद असलेल्या मध्यवर्ती असलेल्या देखरेख विभाग यंत्रणेची स्थापना करण्यात येईल.यामुळे देशातील सहकारी क्षेत्रातील कार्यपद्धतीत अमुलाग्र बदल होणार असून एकंदरीत सर्वत्र कामकाजामध्ये पारदर्शकता येऊन देशातील सर्व नागरिकांना, सहकार क्षेत्रातील विविध खात्यांच्या सेवांचा लाभ उत्तमरीत्या मिळेल.सध्यस्थितीत अनेक पर्यायांचा केंद्र सरकार अवलंब करत आहे,त्यापैकी हा सहकार क्षेत्रातील खात्यांच्या कामकाजाचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. एकंदरीतच देशातील सर्व नागरिकांना याचा फार मोठ्या प्रमाणात लाभ मिळून सहकार क्षेत्रातील सेवा नागरिकांना त्वरित मिळण्यास उपलब्ध होतील.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top