नांदेड मध्ये जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने,राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त "अभिवादन" कार्यक्रम होणार.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क

(अनिल जोशी)

नांदेड मध्ये दि.02 /10/ 2023 वार सोमवार रोजी, सकाळी 11:00 वाजता,जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने,राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त,"अभिवादनाचा" कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोकरावजी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने होणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त, अभिवादन कार्यक्रमास,काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार आहेत.नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर व उपाध्यक्ष आ.अमरनाथ राजूरकर यांनी सदरहू राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त "अभिवादन" कार्यक्रमास,सर्व काँग्रेसच्या आजी-माजी पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी यांनी सकाळी ठीक 11:00 वाजता,नांदेड येथील कार्यालयात उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top