देशातील केंद्र सरकारकडून,चालू रब्बी हंगामासाठी खतांच्या अनुदानाचे दर जाहीर.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

देशातील केंद्र सरकारकडून चालू रब्बी हंगामासाठी खतांच्या अनुदानाचे दर जाहीर करण्यात आले असून,नवी दिल्लीतील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर,आज प्रसारमाध्यमाना माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. गेल्या 01 ऑक्टोबर पासून नवीन वर्षाच्या येणाऱ्या 31 मार्च 2024 पर्यंत हे सुधारित खतांच्या अनुदानाचे दर लागू असतील.

देशातील केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुधारित खतांच्या अनुदानाचे दर साधारणपणे नत्र खतांसाठी प्रति किलो 47 रुपये 02,स्फुरदाला प्रति किलो 20 रुपये 82 पैसे,तर  पलाशसाठी प्रति किलो 2 रुपये 38 पैसे इतके अनुदान केंद्र शासन देणार असून,केंद्र सरकारच्या सुधारित खतांच्या वरील अनुदानित दरामुळे,देशातील शेतकऱ्यांना अतिशय माफक किमतीत व परवडणाऱ्या किमतीत खतें उपलब्ध होणार आहेत.केंद्र सरकारने जाहीर केलेला निर्णयानुसार,22 हजार 303 कोटी रुपयांची तरतूद केली असून,आंतरराष्ट्रीय स्तरावर जपान बरोबर सुद्धा सेमीकंडक्टर पुरवठा साखळी भागीदाराच्या सहकार्य करारास,केंद्राच्या मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.जपान बरोबर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सेमीकंडक्टर पुरवठा साखळी भागीदारी सहकार्य करार हा जवळपास 5 वर्षांसाठी लागू होणार असून,उभय देशांमध्ये स्वाक्षऱ्या झाल्यानंतर करार अंमलात येणार आहे.देशातील केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत,उत्तराखंडमध्ये जामरानी बहुउद्देशीय धरण प्रकल्पचा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेत समावेश करून घेतल्याची केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top