जी.एन.एम.अभ्यासक्रमामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल.-वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.!

0

- कागलमध्ये वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्या जी.एन. एम.अभ्यासक्रमाची सुरुवात.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर)

 कागल एज्युकेशन सोसायटीने जी.एन.एम.हा अभ्यासक्रम सुरु केल्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध होईल,असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.या शिक्षण संस्थेने विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांबरोबरच कागलमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु करावे.त्यासाठी लागेल ते सहकार्य करु,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.   

कागलमध्ये वाय.डी.माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगच्यावतीने नव्याने सुरु केलेल्या जी.एन.एम.अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.संस्थेचे सचिव प्रताप उर्फ भैया माने,सुनील माने,बिपिन माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, कै.वाय.डी.माने-आण्णा यांनी प्रसंगी पदरमोड करुन कागल एज्युकेशन सोसायटीचे रोपटे लावले आणि वाढविलेही.आज त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. मुलींचेही शिक्षण चांगले होईल या भावनेतूनच कै.अण्णांनी या संस्थेची उभारणी केली.या शिक्षण संस्थेने येत्या काळात बी. एस.सी.,नर्सिंग,एम.बी.बी.एस.,एम.डी.हे अभ्यासक्रमही सुरु करावेत आणि स्वतःचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

कै.वाय.डी.आण्णांमुळेच कागलमध्ये नवोदय.....!

 मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले,देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयाची कल्पना पुढे आली.त्याकाळी कै.वाय.डी.माने- आण्णा यांनी स्वतःची इमारत सात वर्षे मोफत नवोदय विद्यालयाचा दिली.कै.वाय.डी.माने-आण्णांच्या असीम त्यागातूनच कागलमध्ये नवोदय विद्यालय साकारले आहे.

 गोकुळ दूध संघाचे संचालक श्री.पाटील म्हणाले,कै.वाय.डी.  माने -आण्णा यांनी सामाजिक परिवर्तनाच्या भूमिकेतूनच कागल एज्युकेशन संस्थेची स्थापना केली.त्यांना अपेक्षित असलेले कार्य ही शिक्षण संस्था निरंतरपणे करीत आली आहे.

प्रास्ताविकपर भाषणात कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, कै.वाय.डी.माने- आण्णा यांनी शिक्षणाकडे रोजगाराचं साधन म्हणून बघितले.अथक परिश्रम,अफाट जिद्द आणि त्यागातूनच त्यांनी कागल एज्युकेशन सोसायटीचे वैभव उभारले.

कार्यक्रमास कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, सुनील माने,दत्ता पाटील आदी उपस्थित होते.स्वागत बिपिन माने केले.सूत्रसंचालन हसीना मालदार यांनी तर आभार  संचालिका शिल्पा पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top